पान:आरोग्यविज्ञान.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७ तिनें छातीला गारवा आणावा. बर्फ चोखावयास द्यावें किंवा घोट घोट थंड पाणी थोड्या थोड्या वेळानें द्यावें. चाकूसुरीनें कापून अगर भोसकून किंवा करवतीनें करवतून झालेल्या जखमा. — ( १ ) ह्यांसंबंधीं प्रथम करावयाची गोष्ट म्हणजे रक्त येण्याचे थांबविणें. ह्याला उपाय म्हणजे ( अ ) थंड पाणी लावणें, ( ब ) पट्ट्या वगैरे तयार करीपर्यंत जखम बोटानें दाबून धरणें, ( क ) जखम अवयवांत झाली असेल तर तो अवयव वर उचलून धरणें. रक्त फारच येत असलें तर ह्याच्याशिवाय मागें सांगितलेले आणखी उपाय करावे. फार रक्त येण्याचें बंद केलेच पाहिजे. जखम बांधून टाकण्यापूर्वी ( २ ) जखमेंत मळ वगैरे आहे अशी शंका आल्यास जखम नीट धुवावी, मात्र रक्त फार वहात असेल तर ह्या भानगडींत पडूं नये. कारण तेव्हां रक्त लवकर गोठेल तितकें इष्ट असतें. जखम धुणें तें थोड्या उंचीवरून स्वच्छ पाणी जखमेवर ओतून धुणे उत्तम. अशानें सर्व मळ निघून न जाईल तर खच्छ चिंधी पाण्यांत भिजवून तिनें मळ काळजीपूर्वक काढावा. ह्या पाण्यांत थोडे कॅर्बोलिक अॅसिड टाकलें तर फार चांगलें. ( ३ ) जखमेच्या बाजूची कातडी स्वाभाविक असते तशी नीट जुळवून ठेवावी. तिच्यावर चिंधी पाण्यांत भिजवून तिची घडी करून बसवावी, व घडी बाजूला सरूं नये ह्मणून हातरुमालानें जागच्या जागीं बांधून टाकावी. इजा झालेल्या भागाला झोळींत अडकवतां येत असेल तर झोळींत अडकवून अगर खुर्चीवर ठेवून विश्रांति द्यावी.