पान:आरोग्यविज्ञान.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९ गांठ मारण्यापेक्षां, निमुळतें टोंक बोंचूं नये म्हणून विशिष्ट तन्हेनें केलेली टांचणी ह्या कामी वापरावी. असल्या टांचणीला सेफ्टी पिनू म्हणतात. पट्टीची झोळी करून गळ्यांत घालून दुखावलेला हातही तींत अडकवितां येतो. हाड मोडणें. ह्याचे बरेच प्रकार आहेत:- -- ( १ ) हाडाचे नुसते दोन तुकडे होतात, पण एरव्ही फारशी इजा होत नाहीं. ( २ ) हाडाचे तुकडे तुकडे होतात, उदाहरणार्थ गोळी लागून. ( ३ ) हाड मोडून जखम पडते. ह्यांत ज्ञानतंतु, रक्तवाहिन्या वगैरे नाही इजा होण्याचा संभव असतो. असली जखम जरा काळजी करण्यासारखी असते. ( ४ ) हाड मोडून आणखी मेंदु, फुप्फुसांसारख्या शरीरांतील महत्त्वाच्या इंद्रियांना इजा होते. असें होणेंही विशेष काळजी करण्यासारखें असतें. हाड मोडलें आहे असें कसें समजावें:- - ( १ ) त्या भागांतील स्नायूंची शक्ति नाहींशी झाल्यासारखी दिसते. इजा अवयवाला झाली असेल तर तो अगदीं लुला पडतो. (२) भागाचा आकार बदलतो. अवयवाला वांक येतें व तो तोकडा झाल्यासारखा दिसतो.