पान:आरोग्यविज्ञान.pdf/६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० (३) सूज येते व दुखतें, विशेषतः मोडकीं टोंकें एकमेकांवर चढली असली तर. ( ४ ) इजा झालेला अवयव हळूच धरून अखाभाविक दिशेनें वळवितां येतो. (५) इजा झालेल्या भागाला हळू व काळजीपूर्वक चलन दिलें तर मोडलेल्या हाडाचे तुकडे एकमेकांवर घांसतांना समजतात. हाड मोडल्यास करावयाचे तात्कालिक उपायः — जवळपास डॉक्टर असेल तर लगेच बोलावणें पाठवावें. डॉक्टर येईपर्यंत अपघात झाला त्याच जागीं उपाय करावे. इजा झालेला अवयव फिरवणें जरूरच असेल तर हाड मोडल्या ठिकाणीं वरून व खालून एकेका हातानें घट्ट धरून फिरवावा. कपडा आंगावरून