पान:आरोग्यविज्ञान.pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७१ काढणें जरूर असेल तर शिवणी कापून काढावा, पण केव्हांही ओढून काढू नये. हाड मोडलेला भाग स्वाभाविकपणें नेहमीं असतो त्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करावा. असें करितांना तो बहुधा थोडा ओढावा लागतो. असें केल्यावर तो तसाच रहावा ह्मणून बांधून ठेवावा लागतो. ह्याकरितां पातळ फळीचे तुकडे, पुस्तकाचे जाड पुट्ठे, छत्री, काठी यांचा उपयोग केला तरी चालतो. ह्यांची लांबी दुखावलेल्या भागाला जरूर तेवढी घ्यावी. ते आंगाला खुपूं नयेत ह्मणून त्यांच्या व त्वचेच्या मध्ये हातरुमाल, फ्लॅनेल, कागद, टॉवेल, गवत सुद्धां वापरावें, व नंतर ह्या पट्ट्यांमध्यें तो अवयव घट्ट बांधून टाकावा. दुखावलेल्या इसमाला कोठें न्याव- याचा तो, महत्त्वाचें हाड मोडलें असेल तर, निजवून न्यावा. ह्याकरितां दोन लांब, मजबूत काठ्या घेऊन त्यांवर ब्लॅकेट अगर सतरंजी बांधून बिछाना तयार करावा. नुसती दाराची एक फळी घेऊन वर थोडे कपडे घालून तिची डोली त्या माणसाला वाहून नेण्याकरितां केली तरीसुद्धां चालेल. हाड निखळणे. एखादे वेळीं हाड मोडत वगैरे नाहीं पण सांध्यांतून निखळतें व बिलकूल इकडचें तिकडे होत नाहीं. अशा वेळींही त्या भागाची शक्ति अगदीं गेल्यासारखी दिसते, त्याचा आकार बदलतो, येते व तो दुखूंही लागतो. अशा वेळी थंड पाण्याच्या पट्टीचा उपयोग करावा व झोळींत अडकवून अगर फळ्याविळ्यांनीं बांधून सूज