पान:आरोग्यविज्ञान.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ अवयव हलूं देण्याचें बंद करावें. डॉक्टरला बोलावणें पाठवावें. अनुभव नसलेल्या माणसानें सांधा नीट जुळविण्याचा प्रयत्न केव्हांही करूं नये. लचकणे. सांध्यावर एकदम ताण बसल्यामुळे किंवा स्नायूंना फाजिल श्रम झाल्यामुळे ते लचकतात. ह्याला उपाय घट्ट पट्ट्या वगैरे बांधून सांध्याला विश्रांति देणें हा होय. दुसरा उपाय प्लॅनेल अगर लोकरीचा कपडा गरम पाण्यांत बुडवून पिळून त्यानें लचकलेला भाग शेकणें हा होय. शेकणें सारखें एक तासपर्यंत चालू ठेवण्यास हरकत नाहीं. मात्र तेवढ्या वेळांत कपडा पांचपासून आठ वेळ बदलावा. KONG ठेंचणें. ह्याला उपाय म्हणजे थंड पाण्याची पट्टी. भाग विशेष ठेचला जाऊन सूज येण्याची भीति असेल तर शेकणें, पोल्टिस लावणें हे उपाय करावे. 40:0/0 भाजणें. हैं विस्तवानें असेल किंवा आधणाच्या पाण्यानेंही असेल. विशेष इजा झाल्यास डॉक्टरला लगेच बोलावणें पाठवावें. आंगा- वरील कपड्यांना आग लागली तर त्या माणसाला जमिनीवर