पान:आरोग्यविज्ञान.pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७५ अगदी सावकाश चालते. अशा वेळी रोग्याला निजवावा, आंगा- वरचे कपडे सैल करावे, व गरम पाण्याच्या बाटल्या वगैरेंनीं आंगांतील ऊब कायम राखण्याचा प्रयत्न करावा. चोळावे. अगदी बेशुद्ध मनुष्यास अमोनिया हुंगूं द्यावा. थोडी शुद्धि असेल तर चहा प्यावयास द्यावा. हात पाय (२) अशक्तपणामुळें, अतिश्रमामुळें, पोटांत अन्न नसल्यानें अगर शोकाचे वेगानें मेंदूला रक्ताचा पुरवठा नीट झाला नाहीं ह्मणजे घेरी येते. घेरी येण्यापूर्वी भोंवत असतें. ह्या वेळीं उपाय वरीलप्रमाणेच करावे. मेंदूकडे रक्त वाहावें म्हणून डोकें बाकीच्या शरीरापेक्षां खालीं करावें व तोंडावर थंड पाणी शिंपडावें. (३) पडून अगर डोक्यावर टोला लागून मेंदू चेंचला जातो व मनुष्य बेशुद्ध पडतो. ह्या वेळींही भोंवतें, त्वचा गार पडते, नाडी मंद चालू लागते. उपाय वरीलप्रमाणेंच करावे. शिवाय कढत पाण्याच्या बाटल्यांनी पाय शेकावे, व बर्फानें अगर थंड पाण्यांत भिजवून पिळलेल्या फडक्यानें डोकें गार करावें. (४) फेंपरें येणें वगैरे. ह्याला उपाय म्हणजे कपडे सैल करणें, व रोगी खतःला इजा करून घेणार नाहीं अशी तजवीज ठेवणें. जीभ चावली जाऊं नये ह्मणून दोन जबड्यांमध्यें बूच अगर लांकडाचा तुकडा द्यावा. रोग्याला झोंप घेऊं द्यावी.