पान:आरोग्यविज्ञान.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घड्या करून द्याव्या, ७७ ह्मणजे तोंडांतील वगैरे पाणी ओकून पडून श्वासाचा मार्ग मोकळा होईल. (३) नंतर पाठीवर निजवून पाठीच्या वरच्या भागाखालीं (मानेच्या खालच्या बाजूस) उशी द्यावी. अशी उशी दिल्यानें डोकें खालीं जातें व छाती नीट वर येते. नंतर त्या मनुष्याची जीभ हनुवटीला लागेपर्यंत बाहेर ओढावी व ती तशीच राहील सें करावें, ह्मणजे श्वासनलिका जिभेनें बंद न होतां खुली राहील. ( आकृति पहा. ) ( ४ ) त्या मनुष्याच्या डोक्याजवळ बसून त्याचे हात धरून छातीवर जुळवावे व नंतर मनगट व कोंपर यांच्यामध्यें धरावे. हळू हळू पण एकसारखे हात ओढून, लांब करून, डोक्याच्या बाजूला लावावे, म्हणजे छाती फुगून हवा आंत येईल. तेथे सुमारें दोन सेकंद ठेवून पुन्हां छातीवर परत आणावे व दोन सेकंदपर्यंत छाती जोरानें दाबून धरावी, म्हणजे पुन्हां हवा बाहेर जाईल. पुन्हां हात डोक्यापर्यंत नेऊन, दोन सेकंद थांबून, पुन्हां परत आणावे. अशा रीतीनें दर मिनिटास सुमारें पंधरा वीस वेळप्रमाणें श्वासो - च्छ्वास होत असतो तसा कृत्रिम श्वासोच्छ्वास करावा. अमोनिया हुंगूं देण्यानें किंवा घशांत पीस घालण्यानें ह्याला मदत होते. (५) वरील चलनवलन बरेच वेळां केलें म्हणजे स्वाभाविक श्वासोच्छ्वास सुरू होतो, ह्याला तास तास देखील लागेल. श्वास सुरू झाल्यास हातपाय रक्ताशयाच्या दिशेनें जोरानें चोळावे, व कढत पाण्याच्या बाटल्या पाय, कुशी, पोट, छाती यांना लावाव्या, म्हणजे स्वाभाविक ऊब आंगांत आणण्यास व रक्तप्रसार सुरू