पान:आरोग्यविज्ञान.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पीळ भरावा. ७९ दरम्यान एखादा लांकडाचा तुकडा घालावा. दोरी, हातरुमाल, धोतर फाडून त्याचे तुकडे वगैरे जे सांपडेल त्यानें बंधन बांधावें. विष काढून टाकावें. खुपसून रक्त काढून नंतर दंश झालेल्या भागास तुंबडी लावून जखमेंत व आजूबाजूस चाकूचें पातें टाकावें, जखम लालभडक तापवलेल्या लोखंडाच्या सळईनें, नाट्रिक वगैरे अॅसिडानें अगर पोटॅशम परमँ- गॅनेटच्या पाण्यानें भाजून काढावी. हे सर्व उपाय करितांना भिऊन कसर मात्र करितां उपयोगी नाहीं. रोग्यास स्वस्थ पडूं द्यावें, झोंपीं जाऊं देऊं नये. निःशक्तता वाटल्यास, अंमल न येईल इतकी, ह्मणजे सुमारें अर्धा औंस ब्रँडी व दूध वगैरे पातळ पदार्थ पाजावे. लगेच वैद्यास बोलावून आणावें. त्वचेखालीं पिचकारीनें स्ट्रिक्नीन् ( कडू काजन्याचा सत्वांश ) घातल्यास विषबाधा होत नाहीं असा अनुभव आहे. विपन श्रासोच्छास बंद पडला तरी कृत्रिम श्वासोच्छ्वासानें आयुर्मर्यादा वाढवितां येते, व आणखी विषनाशाचे उपाय करितां येतात. समाप्त.