पान:आरोग्यशास्त्र.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

 

आरोग्यशास्त्र

 वाफेने उडून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण हवेतील उष्णतामानावर अव- लंबून असते. उष्णता जितकी जास्त तितकें बाष्पीभवनहि अधिक होते. जर जमिनीला ओलावा मुळीच नसेल किंवा अगदी थोडा असेल व जमीन भुसभुशीत असेल तर बहुतेक भाग जमिनीत जिरतो. जर जमीन उतरती असून खडकाळ व निर्भेद्य असेल तर वाफ होऊन उड्न गेलेल्या पाण्याखेरीज बहुतेक पाणी उताराने वाहून जाईल. ओढ्यांची उत्पत्ति अथवा वाढ त्या वाहून जाणाऱ्या पाण्यापासून होते. ह्यांचेपासून स्थानिक क्षेत्र साफ धुवून निघते. रेताड किंवा इतर अतिशय सछिद्र जमिनीत पाणी इतक्या जलदीने मुरते की, मोठ्या उन्हाळ्यात देखील त्याचे फार बाष्पीभवन होत नाही. इतर प्रकारच्या सर्व जमिनीत जिर- णाऱ्या पाण्याचे प्रमाणापेक्षां उडून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण हिवा- ळ्यांत देखील जास्त असते. जमिनीत झिरपणाऱ्या पाण्याचा काही भाग झाडे, झुडपें व गवताच्या मुळांचे द्वारा पुन्हा शोषला जातो व त्या पाण्याचा काही भाग त्यांच्या खोडांत अगर पातींत राहतो व बराच भाग पानांचे द्वारा वाफेचे रूपाने निघून जातो.
 जमिनीत थेट झिरपणाऱ्या जलापासून भूगर्भातील पाण्याची उत्पत्ति व नवीरण होते. मनुष्यमात्रास त्या पाण्याचा नैसर्गिक झांमुळे, साठवणीने किंवा विहिरीचे द्वारा उपयोग होतो.
 पाणी जमिनीत मुरत असतां भूपृष्ठावरील विपुल असणारा कॅर्बा- निक ऍसिड वायु पाण्यांत शोषला जातो. या वायूमुळे मार्गात येणारे कांही खनिज पदार्थ पाण्यात विरघळतात व त्यांत क्षार तयार होतात.

पर्जन्य

 घराचे छावणीवर पडणारे पाणी साठवून वापरावयास सांपडतें. पर्जन्य किती झाला हे इंचांवर मोजण्याचा प्रघात आहे. सरळ साफ बाजू व तळ असलेले व बिनकाठाचें कांचपात्र एकाद्या उंचशा जागेवर सपाट