पान:आरोग्यशास्त्र.pdf/१००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ आरोग्यशास्त्र ४. आर्द्रता - ही हायग्रॉमीटरने समजते. ५. ओझोन-ह्याचे अस्तित्वाचा तपास . ६. ऊन अथवा सूर्यापासून किरण पसरणें- सनशाइन् रेकॉर्डनें ह्याचें ज्ञान होतें. ७. वातावरणांतील विद्युत् - वातावरणांत नेहमीं विद्युत् असते. पाण्याची वाफ घन होतांना वीज प्रगट होते. ८. पर्जन्यवृष्टि. ९. ढग, धुकें, वादळ - हीं असणें किंवा ह्यांचा अभाव. १. उष्णता पर्जन्यवृष्टीचे खालोखाल उष्णतामापन ही Meteorological निरी- क्षणांपैकी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. उष्णतामापकानें ह्याची नोंद खुल्या छपरांत करतात. भिन्न ठिकाणच्या हवेचें उष्णतामान भिन्न असतें. उष्णतामानांत फरक होण्याचीं कारणें खालीं दिली आहेत. ( अ ) विषुववृत्तापासून अंतरः (आ) समुद्रकिनाऱ्यापेक्षां एकाद्या प्रदेशाची उंची; (इ) पवनाची दिशाः ( उ ) समुद्राचे सान्निध्य. 'उष्णतामापकानें उष्णता मोजतात. पारा अथवा आल्कोहोल नामक मद्य उष्णतामापकांत मुख्यतः वापरतात. फार मोठी उष्णता लावल्या- शिवाय पाऱ्याला उकळी फुटत नाहीं म्हणून पाऱ्याचा उपयोग कर- तात. शिवाय पाऱ्याचा चढ व उतार प्रमाणशीर असतो. शीतमान कितीहि असले तरी आल्कोहोल मद्य गोठलेले आढळत नाही. सर्वांत जास्त उष्णतामान पाऱ्याचे मापकाने समजतें व सर्वात मोठें शीत- -मान आल्कोहोलचे मापकानें दृष्टीस पडतें.