पान:आरोग्यशास्त्र.pdf/१०१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हवामान आणि हवामापन हवेचा दाब ९३ हवेचा दाब वातमापकानें समजतो. वातमापक सामान्यतः पान्याचें असतें. पायाच्या वातमापकांत ३३ इंच लांबीची कांचेची नळी असते. तिचें एक टोक बंद असतें. ती पाऱ्याने भरलेली असून पान्याने भरलेल्या पानांत तिचें खलें टोक ठेवलेलें असतें. समुद्रकिना- -याच्या हवेच्या दाबानें काचनलिकेत पाऱ्याचा स्तंभ तीस इंचांपर्यंत चढलेला राहतो. हवेचा दाब कमी झाल्यास पारा खाली उतरतो. पहा डावर वातमापकांतील पारा उतरतो. हवेचा दाब वाढल्यास पाऱ्याचा स्तंभ चढतो. वातमापकांतील (बॅरॉमीटरमधील ) चढउतार हे चढउतार हवेच्या दाबांतील फेरफारांप्रमाणे होतात. हे फेरफार दैनिक अथवा वार्षिक आणि Cyclonic ( सायक्लॉनिक) अथवा Anti-Cyclonic (अँटि- सायक्लॉनिक) असतात. वातमापकाचे उतारा- वरून हवा उष्ण आहे किंवा आई आहे याचा बोध होतो. जेव्हां पवनाची गति खालून वर होते तेव्हांही हवेचा दाब कमी होतो. उलट- पक्षीं वातमापकांत चढ झाल्यास हवा थंड अथवा घन अथवा कोरडी आहे असा अर्थ होतो. हवा वाईट असल्यास तिच्यांतील फेरफारांना सायवनिक म्हणतात. अलीकडे वातमापकाच्या नोंदी देशांतील मध्यवर्ति ठिकाणास तारेनें कळवितात. वाऱ्याची गति फार गमनशील अशा वातावरणाच्या मध्ये सतत फेरबदल होत राहिल्याने वारे उत्पन्न होते. उष्णता व ओलावा ह्यांमध्यें फेरफार इत्यादि कारणांनीं हवेचे घनत्वामध्यें फरक झाल्यानें वाऱ्याची गति होते. उष्णकटिबंधांत हवा उष्ण होते, ध्रुवाशेजारीं ती थंड होते व पृथ्वीचें भ्रमण ह्यांमुळे वारे वाहतात. पृथ्वीच्या ज्या भागावरून वारे वाहतें त्या