पान:आरोग्यशास्त्र.pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ आरोग्यara भागाचें उष्णतामान वाऱ्याचे अंगीं येतें. हवा जितकी ज्यास्त उष्ण, तितकी त्यांत वाफ जास्त समावते. अगदी भिन्न व तुटक असे ऋतु सर्व हिंदुस्थानांतील बहुतेक भागांत असतात. पृथ्वीचे भ्रमणामुळे अशा प्रकारचे वारे सुरू होतात. विषुव- वृत्ताच्या जवळच्या भागांत तप्त झालेल्या हवेच्या जागीं ध्रुवाकडील थंड हवा वेगाने वाहते. हे दोन वारे पावसाळ्यांत साधारणतः नियमित काळीं सुरू होतात. महासागरावरून येणाऱ्या वाऱ्यापासून पर्जन्यकाळाला आरंभ होतो. ह्या वाण्यास फार आर्द्रता असते. ह्याचेमुळे सर्व हिंदुस्थान- -भर वरचेवर व जोराची वृष्टि होते. North-West चा उगम भूखंडापासून होतो. हा monsoon बहुतेक कोरडा असतो. एकाद्या वेळीं समुद्राकडून वाहण्यामुळे त्याचे ठायीं आर्द्रता येते. म्हणून हिंदुस्थानांत पर्जन्य- काळाचे ह्या भागीं ढग थोडे येतात व पाऊस मधूनमधून पडतो. पर्जन्यवृष्टी उंच व अधिक शीत भाग अथवा डोंगराच्या कड्यासारखा शीत भाग किंवा पाण्याचा विस्तीर्ण भाग ह्यांच्या सन्निध ओलाव्याने भरलेल्या हवेचें उष्णतामान एकदम कमी होतें. तेव्हां वाफ धन होते. वाफेचे कण एकाशीं एक मिळत जाऊन त्यांचे जलबिंदु होतात व त्यांची वृष्टी पृथ्वीवर होते. निरनिराळ्या देशांत होणाऱ्या पर्जन्याचें प्रमाण तेथील स्थितीवर अवलंबून असतें. उष्ण कटिबंधांत बाष्पभवन पुष्कळ होतें व तेथें एकंदरीनें वृष्टी ज्यास्त होते. विषुववृत्तापासून ध्रुवाचे बाजूस पाऊस कमी होत जातो. एकाद्या स्थलाचें अंतर समुद्रकिनाऱ्यापासून जितकें ज्यास्त असतें तितकें पर्जन्याचें मान एकंदरीनें कमी कमी होत जातें. एकाद्या जागेची उंची समुद्रकिनाऱ्यापासून जितकी ज्यास्त असते तितकी वृष्टी तेथें ज्यास्त होते. कारण पर्वत आर्द्र हवेचें आकर्षण करून घेतात व तेथें पर्जन्य होतो. आसामांतील डोंगराचे पायथ्याशीं