पान:आरोग्यशास्त्र.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले असलेल्या सिल्हट शहरांत पावसाची सालीना सरासरी १५० इंच असते, पण समुद्रसपाटीच्या वर चार हजार फूट उंचीवर असलेल्या चेरापुंजी गांवीं पर्जन्य ४५० इंच असतो. हिंदुस्थानांतल्या निरनिराळ्या भागांतील मिळून दोन हजार ठिका- णच्या पर्जन्याचें सालीना सरासरीचें कोष्टक खाली दिले आहे. हिवाळा जानेवारी व फेब्रुवारी उन्हाळा मार्च, एप्रिल व मे जूनपासून सेपटेंबर अखेर ००.९९ इंच ४.५८ इंच ३४-६५ इंच पाऊस मापकानें मोजतात. ह्या मापकांत लोखंडाची चिमणी असून ती पात्रांत सोडलेली असते. चिमणीचा कांठ फार तीक्ष्ण असतो व तिचा व्यास ( Diameter ) पांच इंच असतो. पात्रांत पडलेले पाणी एका इंचाच्या शंभराव्या हिश्शाच्या मानाप्रमाणे चिन्हें केलेल्या कांचेच्या पात्रानें रोज सकाळी बहुधा ९ वाजतां मापतात. हें मापक उघडया जागेवर ठेवतात. चिमणीचा कांठ जमिनीपासून एक फूट उंचीवर असावा. अन्न, प्रकरण ७ वें पेयें व मसाले अन अन्नापासून खालील कार्ये घडतात ः- - ( १ ) वृद्धांचे अवस्थेंत नवीन व अधिक त्वचा निर्माण होतात. ( २ ) विगलित व झडून गेलेल्या त्वचेचे स्थानीं नव्या त्वचांची उत्पत्ति होते. (३) शरीराला इंधनाप्रमाणें उपयोगी पडणारे द्रव्यांचा पुरवठा होतो.