पान:आरोग्यशास्त्र.pdf/१०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ आरोग्यशास्त्र ह्या द्रव्याचा प्राणवायूशी संयोग होतांना यूरिआ, यूरिक अॅसिड, कॅर्बानिक अॅसिड वायु ह्या प्रकारच्या स्वल्प स्वरूपांत रूपांतर होऊन जीवधारणेला आवश्यक अशी प्राणिज उष्णता व शक्ति उत्पन्न होते. अन्नाचे मुख्य दोन वर्ग करितां येतात. एक नैट्रोजनविशिष्ट अथवा मांसोत्पादक व दुसरा नैट्रोजनविहीन. आल्ब्युमिनच्या समान घटनेचे प्रोडिनामक पदार्थ नैट्रोजन वर्गांत येतात. चरबी, तूप, तेल, कार्बोहैड्रेट्स, उद्भिज आम्ल पदार्थ, खनिज क्षार व पाणी हे नैट्रोजनविहीन वर्गात येतात. प्रोटीनची म्हणजे आल्ब्युमिनयुक्त पदार्थाची घटना. नैट्रोजन १६ कार्बन ५४ ऑक्सिजन २२ हैड्रोजन ૭ सल्फर १ १०० जिलेटिन वर्गातील पदार्थांत नैट्रोजन १८ भाग असतो. व कार्बन नैट्रोजनचे मानानेंहि जास्त असतो. हीं द्रव्यें प्रोटीनपेक्षा फार कमी पौष्टिक असतात. नैट्रोजनविशिष्ट व विहीन द्रव्यांचीं नांवें पुढील पाना- वर दिलीं आहेत. नट्रोजन विशिष्ट पदार्थ प्राणरक्षणासाठी आवश्यक आहेत. शरी राच्या प्रत्येक त्वचेत नैट्रोजन असतो. नैट्रोजन नसेल तर रासायनिक फेरफार व शक्तीचें आविष्करण होणार नाहीं. म्हणून नवीन त्वचांची उत्पत्ति व जुन्यांची भरपाई करण्यासाठी पाचक व इतर रसांचे उत्पत्ती - साठीं नैट्रोजनयुक्त अन्नाची आवश्यकता आहे.