पान:आरोग्यशास्त्र.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ आरोग्यशास्त्र राष्ट्रास (योग्य) अन्नाचा पुरवठा अपुरा असल्यास त्याची उन्नति कुंठित होऊन तें अधोगतीला जाईल. शरीराची शक्ति आणि उत्साह च धाडस ह्यांमध्यें फरक आहे. शरीराची शक्ति स्नायूंमध्ये असते आणि उत्साह व धाडस ह्रीं मेंदूचे ताकदीमुळे प्राप्त होतात. स्नायु व मेंदू ह्रीं परस्परांस साहाय्यक आहेत. कृश माणसांचे हातून साहसाचीं व धाडसाचीं कामें होत नाहींत, ह्मणजे त्यांचा मेंदू देखील कमकुवत असतो. म्हणून शरीराचें सामर्थ्य व मेंदूची ताकद येण्यास मांसोत्पादक म्हणजे नैट्रोजनविशिष्ट पदार्थ भरपूर प्रमाणांत सेवन केले पाहिजेत. मांसांतच नैट्रोजन असतो असें नाहीं, तर तो गहूं, तूर इत्यादि द्विदल धान्ये, भुईमूग व दूध इत्यादि पदार्थात असतो. आरोग्य व दीर्घायुत्वाला वनस्पत्याहार मिश्र आहारापेक्षां अधिक चांगला आहे अशाबद्दल पुरेसा पुरावा नाहीं. परंतु मांसभक्षण अधिक केल्यास अपाय घडतो हे उघड आहे. त्यामुळे शरीरांत विषारी पदा थांची उत्पत्ति प्रमाणातीत होते. शरीरांत नैट्रोजनयुक्त स्याज्य पदार्थ पुष्कळ असतात. जारणाचे ( ऑक्सिडेशनचे ) कार्यात बाध येतो. यकृत्, मूत्रपिंड व दुसऱ्या वियोजक इंद्रियांना श्रमाधिक्य होतें, म्हणून ते उत्सर्जित होत नाहींत तर, शरीरात साठून राहतात व गौट (पादाग्र- रोग) व यकृत् किंवा मूत्रपिंडविकार होतो. जिलेटिन वर्गांतले पदार्थ कमी पौष्टिक आहेत म्हणून आल्ब्युमिन वर्गातल्या पदार्थांचे ऐवज ते वापरतां येणार नाहींत. पण जिलेटिनयुक्त पदार्थांचें जारण लवकर होतें म्हणून शीघ्र विकारांत शरीराचा क्षय- म्हणजे शरीर लवकर कृश होऊं नये म्हणून तें उपयोगी पडते. अशा स्थितीत शीघ्र विकारांत प्रोटिन्सचें पाचन सुलभतेनें होत नाहीं. जिलेटिनपासून नैट्रोजनयुक्त त्वचा बनत नसाव्यात, परंतु रक्तांतील जीं द्रव्यें जारण पावतात त्यांपैकीं कांहीं जिलेटिनपासून बनत असावीत.