पान:आरोग्यशास्त्र.pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेये व मसाले ९९ मांसाचा रस यासारखे ' एक्स्ट्रॅक्टीव्ह ' ( एक्स्ट्रॅक्ट=खेचर्णेः एक्स्ट्रॅक्टीन=एखादा भक्ष्य पदार्थ शिजविल्यानें त्याचा जो भाग पाण्यांत द्रवण पावतो तो) पदार्थांपासून शरीराचे पोषण अगर उष्णतेची उत्पत्ति हीं दोन्ही होत नाहींत तर तें अन्नाचें पाचन व शोषण- क्रियेचें नियमन व उत्तेजन करितात. अन्नांत जिलेटिन व तत्सदृश द्रव्य असल्यानें हें कार्य विशेषतः होतें. हैड्रोकार्बन्स, चरबी व तेलें हे पदार्थ ग्लिसेरिन व फॅटी अॅसिडस् म्हणजे आत्मद्रव्ये (स्टीमरिक अॅसिड, ओलेइक अॅसिड, मार्गारिक अॅसिड, पामेटिक अॅसिड ) यांचे संयोगाने बनतात. त्यांमध्यें नैट्रोजन अगदी नसतो तर, त्यांत कार्बन्, हैड्रोजन व ऑक्सिजन् हे पदार्थ असतात. हैड्रोजनशीं संयोग पावून पाणी बनण्याइतकें ज्यास्त प्रमाण ऑक्सिजनचे नसतें. तूप, चरबी, तेल इत्यादि स्नेहयुक्त पदार्थांवर लाळ व जठररसाचा कांहीं परिणाम घडत नाहीं व त्यांचें कांहींएक रूपांतर न होतां ते जठराचे पलीकडे तसेच जातात. परंतु, लहान आंतड्यांत पॅक्रीयाजचा रस व पित्त ह्यांमध्ये ते दुग्धसदृश होतात व ते दुग्धवाहिन्यांकडून शोधित होण्यास पात्र होतात. स्नेही भागा- पैकीं कांहीं भागांचें पृथःकरण होऊन ग्लिसेरिन निराळे होतें व फॅटी अॅसिड निराळें होतें. फॅटी अॅसिडमध्यें अल्कली म्हणजे क्षार संयोग पावून त्यापासून अल्कलाईन, ओलीएट इत्यादि नवीन प्रकारचे संयुक्त पदार्थ ( साबण ) बनतात व दुग्धवाहिन्यांत व रक्तवाहिन्यांत ह्या दोन्हींकडून शोषणपात्र असतात. स्नेहयुक्त अन्नामुळे स्नेहयुक्त त्वचांची पुन्हां स्थापना करणें, प्राण- शक्तीची उत्पत्ति करणें व कार्बनिक अॅसिड व पाणी ह्यांची उत्पत्ति करून उष्णतेची उत्पत्ति करणें हे त्यांचे उपयोग आहेत. अन्नांत स्नेहयुक्त पदार्थ असल्यामुळे पॅक्रियाजमधील रस व पित्त यांची उत्पत्ति वृद्धिं-