पान:आरोग्यशास्त्र.pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० आरोग्यशास्त्र गत होते. ह्यामुळे अन्नाचे पचनास साहाय्य होतें व आंतड्यांचे उत्स- जनक्रियेला मदत होते. पित्त व आंतड्यांतील रस कमी असल्यास ह्रीं कार्ये मंदतेनें होतील. उद्भिज स्नेही पदार्थाचे पेक्षां प्राणिज स्नेही पदार्थांचें पाचन व शोषण अधिक असतें. अन्नांत स्नेही पदार्थांचें आधिक्य असल्यास ते न पचर्ता मलद्वारां शरीराबाहेर पडतील. गोड्या तेलाचा उपयोग जवळ जवळ लोणी व चरबी ह्यांच्या इतका होतो. कार्बोहैड्रेट्स् ह्या पदार्थांच्या घटनेंत कार्बन्, हैड्रोजन व ऑक्सिजन् ह्रीं मूलतत्त्वें असतात. ह्यांत ऑक्सिजनचे प्रमाण इतकें असतें कीं, त्याच पदार्थांतील हैड्रोजनशीं संयुक्त ग्रेपशुगर बनते. ह्या रूपांतरास मुखामध्यें आरंभ होतो. तिचे चर्वणाचे क्रियेंत लालोत्पत्ति होऊन तिचें मिश्रण अन्नाशी होतें. ही रूपांतराची क्रिया जठरामध्यें न चालतां पुढें तिची पूर्तता पैंक्रियाजचे रसामुळे लहान आतड्यांत होते. स्टार्च मध्ये CH: रासायनिक संयोग व फेरफारामुळे पाण्याचा ६१०५ ६ १२६ एक अणु स्टार्चमध्यें संयुक्त होतो व असें रूपांतर होऊन पशुगर बनते. ह्या रूपांत ती पोर्टल व्हेनचे द्वारा यकृतांत जाते व तेथेंच ग्लेकोजन अथवा लिव्हर स्टार्च ह्या रूपांत तिची स्थापना होते. रूपांतर झालेली स्टार्च सांठवून ठेवण्याचें यकृत् हें भांडार आहे. शरीरास कारण पडेल त्याप्रमाणे हे पदार्थ खर्ची पडतात. उष्णता व शक्तीचा आविर्भाव करणें व शरीरांतील स्नेहयुक्त पदार्थांची स्थापना करणें ह्या कामी ते उपयोगी पडतात. हा कार्बोहैड्रेट्स पदार्थांचा उपयोग होय. स्टार्चचे साखरेचें अधिक सेवन करण्याने शरीरांत वात वाढतो व तें लठ्ठ होतें. ह्याचें आणखी कारण असें आहे कीं, ज्वलनास चरबीचा अंश खर्ची पडला असतां तो ह्या पदार्थांचें आधिक्य शरीरांत असल्यानें रूपांतर पावलेल्या स्थितींत उणा पडत नाहीं. शिवाय नैट्रोजन विशिष्ट पदार्थांचे रूपांतर होऊन चरबीच्या कांहीं अंशास उत्पत्ति होते.