पान:आरोग्यशास्त्र.pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ आरोग्यशास्त्र पणें होत नाहीं. कांहीं अपूर्ण ऑक्सैड्स् शरीरामध्ये सांठून राहतात व रोगांची उत्पत्ति होते. सेंद्रिय आम्ल द्रव्य (ऑर्मनिक अॅसिड्स) ह्यांचे योगानें शरीरांत कार्बो- नेट्स बनतात व त्यामुळे रक्ताचा व इतर द्रव्यांचा क्षारधर्म कायम राहतो. हा त्याचा मुख्य उपयोग आहे. परंतु त्याचेमुळे ऑक्सिडेशन् होते; म्हणून थोडी उष्णोत्पत्ति व शक्तीची उत्पत्ति होते. हे पदार्थ अन्नांत नसल्यानें रक्त सत्त्वहीन होतें व स्कर्वी नामक रक्तविकार होतो. दूध, मांस व ताज्या भाज्या व ताजें अन्न यांचे आंगीं स्कर्वीप्रतिबंधक धर्म आहे. गोठलेले दूध व सुकवून ठेवलेले पदार्थ ह्यांचेपासून स्कर्वी होते. शरीराचे वाढीस व दुरुस्तीस नमकें ( साल्ट्स् ) लागतात. लैमचें, पोटॅशचें व मॅग्निशियमचें फॉस्फेट अस्थिभवनास आवश्यक आहे. लोह रक्ताचें कणाचें घटनेत अत्यंत जरूर लागतें. क्लोरिन जाठररसास, पोट्याश रक्तकण व घनभागास, सोडा हा सेलच्या दरम्यान असणारे भागाला लागतो. क्षाराची जरूरी प्रत्येक वयोमानास पण विशेषतः अर्भकांना व बालकांना असते. जल:- शरिरांतून घाम, मूत्र, उच्छ्रास इत्यादि मागांनी पाणी बाहेर पडतें, त्याची भर करण्यासाठी पाणी प्यावें लागतें. शिवाय अन्नाचें द्रावण करण्यास व तें मंद करण्यास पाणी लागतें. अशा रीतीनें तें पचनास उपयोगी पडतें व तें घेतल्याने शरीरांतील व्याज्य व विषारी पदार्थ द्रवीभूत होऊन बाहेर पडतात. अन्नाची पचनीयता - निरनिराळ्या स्थितींमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या अन्नांची पचनीयता किती असतं ह्याबद्दल फारशी माहिती नाहीं. परंतु खालील गोष्टी निश्चित झाल्या आहेत. सामान्यतः खाण्यांत येणारें मांस व मासे, दूध ह्यांमधील प्रोटीन त्वरित व सर्व पचित होतें.