पान:आरोग्यशास्त्र.pdf/११३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• अन्न, पेयें व मसाले .१०५ १६० फूट टन शक्ति निर्माण होते. म्हणून १६×१६०=२५६० घनफूट शक्तीचा व्यय आपण स्वस्थ राहिलों तरी होतो. इतकी शक्ति निर्माण करण्यास किती अन्नाचे सेवन केलें पाहिजे हे वरील माहिती - वरून काढतां येईल. परंतु येल युनिव्हर्सिटीतील प्रो. चिटेंडेन् म्हणतात कीं, रोजचें अन्न देण्याची जी ठराविक मापें आहेत, त्यांचेपेक्षां निम्याने अन्न दिलें तरी आरोग्य व जोम कायम राहतो. कमी अन्नाचें ग्रहण करणाऱ्याला सुरु- वातीला कांहीं थकवा व शरीराचे वजनांत न्यूनता येते. परंतु, थोड्या दिवसांनी पूर्ववत् स्थिति प्राप्त होते. हें मत विचार करण्यासारखे आहे, परंतु तें पुष्कळांना मान्य नाहीं. शरीरांतील व्ययाचे मानापेक्षां अधिक अन्न घेतल्यास त्यापैकीं बऱ्याच भागाचें पचन होत नाहीं. आतड्यांत नेहमी वास्तव्य कर- णाऱ्या सूक्ष्म कृमींच्यामुळें अपचित अन्नांत दरवळण्याची व कोथभव- नाची क्रिया चालू राहते; कर्पट ढेकरा व दुर्गंध अपानवायु उत्पन्न होतात; अग्निमांद्य व अतिसार होतो; कुजलेल्या कांहीं पदार्थांच्या कांहीं अंशाचें रक्तांत शोषण होऊन ज्वर, मंदत्व, मस्तकशूळ, मुखास दुर्गंधी ह्या भावना होतात. चरबी व पेजविशिष्ट पदार्थांची अतिमात्रा घेतल्यास आम्लपित्त व पोटफुगी होते. हे पदार्थ नेहमीं फार खाल्यास चरबीचें मान वाढून स्थूलपणा येईल. अतिभोजन केल्यानें अन्नाचा भाग मळांत दिसतो व कधीं कधा मूत्रांत शर्करा व आल्ब्युमिन आढळते. सतत कमी अन्न खात गेल्यास शरीराचें वजन तुटतें व अशक्तता, शक्तिपात आणि निरक्तता उत्पन्न होतात. असें करीत करीत उपास- मारीपर्यंत मजल पोहोंचल्यास जीर्णज्वर व जठरव्यापाराची अनावस्था होऊन मृत्यू येतो. तथापि असें पाहण्यांत येतें कीं, मनुष्याचे प्रकृतीला ३०।४० दिवसांचा उपास सोसतो. पाणी मात्र भरपूर द्यावें लागतें.