पान:आरोग्यशास्त्र.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ आरोग्यशास्त्र अन्नाची निवड व त्याचें मान ठरवितांना पुष्कळ गोष्टी जमेस धरल्या पाहिजेत. त्या अशाः- - (१) वय - १० वर्षांच्या मुलांना निम्म्याने व १४ वर्षांच्या मुलांना प्रौढ स्त्रियांइतकें अन्न लागतें. ८ ते १० वर्षांच्या वयाचे मुलांना रोज ६ औंस मांस, १४ औंस पाव, ६ औंस बटाटे, ९ औंस दूध व थोडें लोणी व भाजी इतकें अन्न द्यावें. मेहनतीचें काम करणाऱ्या मनुष्यास ९ औंस मांस, १८ औंस पाव, १६ औंस बटाटे, १६ औंस दूध १२ औंस लोणी व तीन औंस ओटचें पीठ इतकें अन्न दिलें पाहिजे, म्हणजे पुष्टी चांगली येते. वार्धक्यांत मांस, साखर व पेजविशिष्ट पदार्थ हे शेकडा १५ प्रमाणांत कमी द्यावे व साखर नेहमींपेक्षां अधिक द्यावी. ( २ ) जाति-पुरुषांपेक्षां स्त्रियांना भागानें कमी अन्न पुरतें. (३) अन्नाची निवड - उपलब्ध वस्तु असतील त्या पाहून त्यांपैकीं भिन्न भिन्न प्रकारचें अन्न मधून मधून उपयोगांत आणावें. निरनिराळ्या पदार्थांची पचनीयता पाहावी. ( ४ ) कोणत्याही अन्नाची निवड केली तरी त्या त्या दिवसाचे अन्नति आल्ब्युमिनविशिष्ट स्नेही व कार्बोहैड्रेट्स ह्या जातींच्या पदार्थांचें परस्पर प्रमाण चुकूं नये. क्षारांचे मान कमी होऊं नये. मांसाचें प्रमाण ठरवितांना अस्थींबद्दल शेंकडा २० वजन कमी करावें. ( ५ ) जेवणाच्या वेळा-जेवण चार वेळां घ्यावें; सकाळीं न्याहारी, दुपारचें जेवण, चहा, रात्रीचें भोजन ह्या प्रत्येकामध्ये ४/४ घंट्यांचें अंतर असावें. प्रौढ म्हणजे वयांत आलेल्या मनुष्यास ३ वेळां जेवण पोचलें तरी पुरतें. शाकाहारी लोकांची प्रकृति सुदृढ राहण्यास अन्नाची निवड कशी करावी ह्याविषयीं कांहीं माहिती खाली दिली आहे. नैट्रोजनविशिष्ट उद्भिज द्रव्यांपैकी किती भागाचे शोषण होते हा मुख्य प्रश्न आहे.