पान:आरोग्यशास्त्र.pdf/११६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ आरोग्यशास्त्र इंग्लंडसारख्या देशांतील मोलकरणी आपली मुलें घरीं टाकून कामा- घर जातात. ह्यामुळे मुलांची हयगय होते. म्हणून बाळंत झाल्यावर एक - महिन्याचे ऐवजी तीन महिने संपेपर्यंत अशा बायांना कारखान्यांत काम करण्याची बंदी ठेवावी अशा सूचना येतात. फ्रान्स देशांत गरोदर मोलकरणीसाठीं वसतिगृहें स्थापन केली आहेत. १ महिन्यापासून १५ दिवसपर्यंत त्यांना विसांवा मिळाला तर पूर्ण काल झाल्यावर प्रसूति होते व मूल सशक्त व पूर्ण वाढ पावलेलें असें निपजतें. त्या देशांत गरोदर व नवप्रसूत स्त्रियांना सल्ला देणाऱ्या संस्था स्थापन झाल्या आहेत. मुलांना पूर्ण मुदतपर्यंत पाजण्याबद्दल तेथें उत्तेजन दिलें जातें. अन्नापैकीं भिन्न भिन्न पदार्थाचं वर्णन पुढें प्राणिज पदार्थाचें वर्णन करून नंतर उद्भिज पदार्थांचें केलें आहे. मांस (Meat) मांसामध्यें नैट्रोजनविशिष्ट पदार्थ अधिक प्रमाणांत असतात. थोडी चरबी व क्षार असतात. क्षार मुख्यतः पोटॅशचे क्लोरेट्स् व फॉस्फेट्स असतात. मांसाचे पचन जलदी होतें व त्याचें शोषणहि सहज होतें. मांसामुळे त्वचांतील घडामोडी जल्दी होतात. त्याचें पृथःकरण- नैट्रोजनविशिष्ट पदार्थ आल्ब्युमिनाइड्स २० ह्यापैकीं १५·५ भाग पचनीय असतो व बाकीचा ४५ अपचनीय असतो. चरबीमध्यें पौष्टिक भाग पुष्कळ असतो. त्यांत आल्ब्युमिनयुक्त पदार्थ, जिलेटिन शेंकडा २४ भाग असतो. जिलेटिन २४, चरबी ११, राख, खनिज द्रव्ये ४८. अस्थी पाण्यांत शिजवावी म्हणजे अतिपौष्टिक रस तयार होतो.