पान:आरोग्यशास्त्र.pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाला १०९ चांगले भक्षणीय मांस कठीण व चिवट असतें. त्याचा रंग गहरा लाल असतो. जांभळा किंवा फिकट नसतो; व तें थलथलीत नसतें. स्नायूच्या दरम्यान असणाऱ्या सेल्यूलर त्वचेंत आर्द्रतेचें आधिक्य नसावें वं त्यांतून पू अथवा द्रव पाझरूं नये. मांसांत गारठा नसावा. त्याचा वास ताजा असावा व अप्रिय असूं नये. त्यांत कुजकेपणाचा किंवा औषधाच्या घाणीचा लेश देखील असूं नये. मांस कुजूं लागलें म्हणजे फिक्के व मृदु होतें. त्यांतील रसाचा आम्ल धर्म नष्ट होतो व पुढें मांस हिरवट दिसूं लागतें. कोथभवन ( कुजण्याची ) क्रिया चालू झाली कीं काय, हें पाइण्यासाठीं मांसांत चाकू खुपसावा व नंतर हुंगून पाहावें. मांसाचा तुकडा कापून आधणाचे पाण्यांत घालावा, म्हणजे को भवन असल्यास वाफेला घाण येईल. चरबी घट्ट, फिक्कट व पिवळ्या रंगाची असावी व त्यावर रक्ताचे बिंदु नसावे. लिंफॅटिक ग्लॅड (उदकपिंड) ह्यामध्यें दाह, रक्तसंचय किंवा ग्रंथी असल्या तर जनावराला आजार झाला आहे असें समजावें. गाई वगैरे जनावरांच्या लिंफॅटिक ग्रंथी आरोग्यावस्थेत वाटाण्याच्या आकाराच्या अस- तात. कण्याचे बाजूवर फफ्फुसाचे दरम्यान (टूकिआ ) श्वासमार्ग दुभागतो. त्या स्थळीं लिंफॅटिक ग्लँड असतात. ह्या कठीण व थोडया आई असून अंतर्भागीं त्या फिक्या करड्या पिवळ्या रंगाच्या असाव्या. अस्थीच्या नळींतील रस फिक्कट तांबडया रंगाचा असावा. फुफ्फुसांमध्ये दाह, विद्रधी, क्षय, वातपित्त अथवा ऍक्टिनो-मॅकोसिस आहे कीं काय हे पहावें. यकृतांत डिस्टोमा (लिव्हर फ्लेक), क्षय, व्याप्ति, हॅडॅटिडग्रंथी आहेत की काय हें पहावें. पांथरीची वृद्धि आहे किंवा त्यांत ग्रंथी झाल्या आहेत हे पहावें. शिजविणें मांस शिजविल्यानें त्यांत कोथभवन होत नाहीं, तें पचनीय होतें व त्याला चव येते. शिजविण्याच्या क्रियेनें स्नायुतंतूंना वेष्टणारी संयोजकः