पान:आरोग्यशास्त्र.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ आरोग्यशास्त्र . . ही आम्ल द्रव्ये दगडी कोळसा व (धूम्रवायूचे ज्वलनापासून) धुरांचे दिव्यांपासून उत्पन्न होतात. पर्जन्यामुळे हवेत तरंगत असणारे असंख्य रोगजनक प्राणिज व उद्भिज जंतु व त्यांची अंडी धुतली जाऊन साफ निघून जातात. उन्हा- ळ्यांत प्रथम येणाऱ्या वृष्टीमध्ये हे जंतु फार अधिक सापडतात. पाऊस लागून राहिल्यावर पुढे पडणाऱ्या उदकांत हे कृमी आढळतात. दर लिटर पाण्यात २ लक्ष जंतु सामान्यतः आढळतात. उन्हाळ्यांत पड़- णाऱ्या पाण्यात ही संख्या अधिक असते. हिवाळ्यांत व वसंतऋतूचे आधी पडणाऱ्या पाण्यांतहि अधिक असते. पर्जन्याबरोबर पडणाऱ्या जंतूंपैकी बहुतेक मैक्रोकोकै वर्गातील असतात. जंतूंशिवाय फुलादिकां- तील पराग, सूक्ष्मतम ( दृष्टीस अगोचर असे सूक्ष्म ) तरुविशेष ( उ० प्रोयेकोकस प्लविएलिस.) आणि छत्रीवर्गातील उद्भिजांची बीजे ही कधी कधी पावसाबरोबर पडतात. अशा रीतीने पर्जन्याने हवेची शुद्धि होते. त्यामुळे घन व वायुरूप प्राणिज व खनिज या सर्व प्रकारचा मल धुऊन जातो. म्हणून पर्जन्य- काळांतील आरंभींचे पाणी व धूर आणि इतर खनिज व प्राणिज पदार्थांनी भरलेल्या अशा शहराच्या हवेत पडणारे पाणी पिण्यास योग्य नसते. जर छावणीवर पडणाऱ्या पर्जन्याचे पाणी धरून ठेवावयाचे असेल तर धुराचे किटण, उद्भिज द्रव्ये, पशुपक्ष्यादिकांचे मल इत्यादि तिजवर पडलेले पदार्थ धुऊन जावे ह्मणून पावसाचे सरीचे प्रथमारंभी पडणारें पाणी साठविण्यासाठी न धरता तसेंच बाहेर वाहं द्यावें पुढे पडणारें साठवावें. पर्जन्याचे जल होईल तितक्या शुद्ध स्थितीत भरून ठेवावें. नाहीतर ज्या हौदांत तें उतरतें तो मलिन होईल व त्यांत पडणारे पाणीहि त्यामुळे अशुद्ध होईल. आंतीम स्थली ठेवलेल्या पाण्याचा उपयोग निर्जल प्रदेशांत तर अत्यंत आहेच, परंतु हिम प्रदेशांतहि .