पान:आरोग्यशास्त्र.pdf/१२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ आरोग्यशास्त्र मांस विकण्यास प्रतिबंध असतो म्हणून हे रोग फैलावत नाहीत. कधीं कधीं जनावरांचा एखादा दूषित भाग तेवढा विकण्याची मनाई करितात. बर्लिन येथील कसाईखान्यांत शेकडा १५ ते १६ गाईबैलांना ( ट्युबर्क्युलेसिस) क्षय झालेला आढळतो. क्षयग्रंथी ( टयुबर्कल ) स्नायूंत सहसा नसतात. परंतु अंतरिंद्रीयें व पिंड ह्यांत आढळतात. क्षयी गाईच्या दुधापासून कांहींएक अपाय होत नाहीं. परंतु तिचे स्तनावर क्षयग्रंथी असल्यास रोगाचा प्रसार होतो. अलीकडील शोधा- वरून स्तनास रोग नसला तरी क्षयाचा प्रसार होतो असे समजतें. परंतु, दुधास आधण आणून नंतर प्याल्यास अपाय घडत नाहीं. रोगी दुधापासून क्षयाचा प्रसार अधिक वेळां होतो. बैल व डुकर ह्यांचे सिस्टिसेरीपासून मनुष्यांमध्यें अनुक्रमें पुढील रोग होतात - टीनिआ, मीडिओ कॅनेल्लेटा व टीनिका सोलिअम. पण दूषित मांसाला कांहीं मिनिटें १५०° फॅरेनहैट उष्णता लावली तर जंतु मरतात. टिनिआ स्पयरॅलिस ह्या जंतूंना कांहीं अधिक उष्णता लाविली तर ते मरतात. परंतु, वरील जंतुंयुक्त मांस खारवण्याने किंवा तें धुरावर धरल्याने दूर होत नाहींत. मांस खाण्यास अयोग्य होण्याचें कारण कोथभवन होय. फार कृश असल्यास सबंध जनावर अयोग्य ठरवावें. परंतु, सडपातळ जनावर त्रिकं द्यावें. त्याचप्रमाणें ग्लॅडर्स, सार्वत्रिक ट्युबर्क्युलोसिस, मजिल्स व ऍथँक्स हे रोग झालेल्या जनावरांचे विक्रीला मनाई असावी. स्थानिक दाह अथवा कोथभवन, एंक्टिनोमायकोसिसची प्रथमावस्था, स्थानिक ट्युबर्क्युलोसिस, लिव्हर फ्ल्यूक व एकिनोकोकी ह्या विकारांत सर्व जना वर नापास करणें अयोग्य आहे. त्यापैकीं आजारलेला भाग वगळून बाकीचा कठीण व चांगल्या रंगाचा भाग घ्यावा. दाहयुक्त, सूजयुक्त विकारांच्या प्रथमावस्थेत कापलेल्या जनावरांचें मांस, फुट व मौथ डिझीज,