पान:आरोग्यशास्त्र.pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेर्ये व मसाले ११३ व प्ल्युरो - निमोनिआच्या साथीच्या जनावराचें मांस, चांगले शिजविल्यास खाण्यास योग्य आहे. परंतु, मृत्युपूर्वी त्या जनावरास कडक औषधें फार पोचली असल्यास तें अपायकारक होण्याचा संभव आहे. राइंड स्पेस्ट, स्वैन फीव्हर, ब्रेक्सि व मेंढ्याच्या देवी ह्या आजारांच्या जनावरांचे मांस खाण्यास योग्य किंवा अयोग्य आहे याबद्दल वाद आहे. मासे मासे यांना होणाऱ्या पॅरेसैट आजारांपैकी टेपवर्म हा आजार असला तर त्या माशांच्या सेवनानें मनुष्यास अपाय होतो. ऑइस्टर व म्युसेल्स खाल्ल्यानें मळमळ, वांति, कष्टश्वास, स्नायुदौर्बल्य अशा विषारी भावना होतात. ऑइस्टरमुळे पित्ताच्या गांधी उठतात. यकृत् वृद्धिंगत असलेले म्युसेल्स विषारी असतात व गटारांत झालेले म्युसेल्स व ऑइस्टरचे सेवनानें टायफॉइड ज्वर पसरण्याचा संभव असतो. मासे कुजूं लागले कीं, त्यांची परीक्षा सहज होते. त्यांचे कल्ले तेजस्वी असणें, डोळे टव- टवीत असणें व मांस दृढ व स्थितिस्थापक असणें ह्रीं निरोगी माशांची चिन्हें होत. मीट-एक्स्ट्रॅक्ट पुष्कळ मीट एक्स्ट्रॅक्ट विकावयास ठेवलेले असतात. त्यांचे आंगीं पौष्टिक धर्म आहे अशी चुकीची समजूत असते. त्यांचेमध्यें मांसाचे एक्स्ट्रॅक्टिव्हज् असतात, प्रत्यक्ष मांसाचा भाग नसतो. इतर अन्न जाण्याला ते मदत करतात, कारण त्यांचेमुळे जाठररसाची उत्पत्ति वाढते, पच- नास मदत होते व क्षुधा वृद्धिंगत होते. परंतु शरीरास लागणारा नैट्रो- जन त्यांचेमध्ये फार थोडा असतो. मीट-एक्स्ट्रॅक्ट पिवळ्या रंगाचा,