पान:आरोग्यशास्त्र.pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले ११५ अधिक घालणें अपायकारक आहे. वासावरून सॉसेज बिघडूं लागला असे समजतें. चुन्याची निवळी घातल्याने चांगल्या सॉसेजमधून फार थोडी अमोनिआची घाण येते व वाईट मांसांतून फार येते. अंडीं ताज्या व शिळ्या अंड्यांची परीक्षा ( १ ) उभी धरलीं असतां ताज्या अंड्यांचा मध्यभाग पारदर्शक असतो, शिळ्यांचीं टोकें पारदर्शक असतात. (२) वीस औंस पाण्यांत दोन औंस मीठ घालावें; ह्या द्रावणांत सोडल्यास ताजीं अंडीं बुडतात व शिळीं तरतात. दुग्ध जन्मानंतर थोड्या बहुत काळपर्यंत सर्व जातींच्या सस्तन प्राण्यांचें दुग्ध हें नैसर्गिक अन्न आहे. म्हणून अन्नाच्या उत्तम यादींतील सर्व घटक दुधांत सांपडतात व बाल्यावस्थेत वाढीस व पूर्णत्वास अनुकूल अशा प्रमाणांत ते घटक असतात. हिंदुस्थानांत दूध हा बिनमोल पदार्थ आहे. युरोपियन लोकांना ज्याप्रमाणें मांस, त्याप्रमाणे हिंदी लोकांना दूध हें पोषक अन्न आहे. दूध हें सृष्टिनिर्मित उत्तमापैकीं उत्तम अन्न आहे. दुधामध्यें प्रोटीन, चरबी, कार्बोहैड्रेट, क्षार आणि पाणी असतें. प्रोटीन ३ भाग असतें. तें मांस, स्नायू व रक्त यांची वृद्धि करतें. चरबी ३ ते ४ भाग असते. कार्बोहैड्रेट शेकडा ४ ते ५ भाग असतो. तो शरिरांत उष्णता उत्पन्न करितो. मनुष्यप्राण्याशिवाय खालील जना- वरांचें दूध प्रायः उपयोगांत आणितात. त्यांच्या घटक द्रव्यांचे प्रमाण खाली देत आहें.