पान:आरोग्यशास्त्र.pdf/१२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेये व मसाले ११७ प्रमाणांत नाहींशा होतात व प्रसूतीनंतर बारा ( १२ ) ते पंधरा ( १५ ) महिन्यांत स्तनें लहान होतात व तीं पुनःश्च गर्भधारणे- पर्यंत तशीच राहतात. सर्व सस्तन प्राण्यांना प्रसूतीनंतर लगेच अगर थोड्या तासांचे अंतराने प्रसूतीपासून निसर्गतः अपत्यावर उत्पन्न होणाऱ्या प्रेमामुळे दुधाचा पान्हा फुटतो व अर्भकाचें पोषण होतें. सस्तन प्राण्यांच्या अर्भकाचें कांहीं काळपर्यंत मातेच्या स्तनांतून आलेलें कांहीं जीवनामृत शरीरपोषण व शरिराची वृद्धी करण्यास सर्व अंशी समर्थ असतें. मनुष्यप्राण्यांत लहान तान्हें मूल नऊ महिनेपर्यंत यथेच्छ जीवनामृताचें पान करून वृद्धिंगत होतें. मूल दर दोन तासांनीं दूध घेतें. वेळेस सरासरी २-३ औंस दूध लागतें. पुढें दोन महिन्यांनंतर आईचे स्तनांतून दर ४-४ तासांनीं ४ - ४ औंस दूध निघू शकते. साधारण ६ महिने झाल्यावर आईचे दुधाचें प्रमाण कमी होऊन लहान मुलांना गाईचें दूध देण्याची जरूरी पडते. आईचें दूध व गाईचें दूध यांमध्यें निसर्गत: बरेंच साम्य असले तरी घटकावयवांचे प्रमाणांत फार फरक असल्याकारणानें गाईचें दूध आईचे दुधासारखें करणें भाग पडतें. नऊ महिन्यांपेक्षां कमी वयाचे मुलांना गाईचें दूध घालावयाचें असल्यास त्यांत पाणी घालून तें मंद करावें व त्यांत थोडी दुधाची साखर घालावी. ह्या दुधाच्या गांठी मृदू व्हाव्या म्हणून पर्ल बार्लीच्या गाळलेल्या कषायासारखा एखादा उपलेपक पदार्थ त्यांत घालावा, म्हणजे केसीनचे कण एकमेकांशी दृढ चिकटून बसणार नाहींत. गांठी दिल्या असल्यानें त्यावर जाठररसाची क्रिया सुलभतेनें होते. गाईचे दुधाच्या घट्ट गांठी होऊं नयेत म्हणून, दर औंस दुधांत २ ते ३ ग्रेन सैट् ऑफ सोडा घालावा. म्हणजे लाइम क्षारांचा साखा बसतो. अशा दुधापासून मानवी दुग्धाप्रमाणे हलक्या व विशविशित गांठी होतात.