पान:आरोग्यशास्त्र.pdf/१२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ आरोग्यशास्त्र गाईच्या दुधाची घटना मानवी दुधाप्रमाणे करून नंतर तें तान्ह्या मुलांना देतात. ही करण्याच्या सर्वांत सोप्या व उत्कृष्ट कृतीला "व्हे क्रीम मिश्रण " ( दधि-साय मिश्रण ) म्हणतात. थंड जागेंत ५० तोळे दूध तीन तास राहूं द्यावें. वर आलेली साय काढून घ्यावी. पुढें तें दूध निम्में निम दोन पात्रांत ओतावें. पैकीं एका भांड्यांत रेनेट घालावें व दही बनल्यावर तें पिळून घ्यावें. ह्या पाण्यांत रेनेट नामक फर्मेंट शिल्लक राहूं नये म्हणून १५०° सेंटिग्रेड उष्णतेपर्यंत हें तापवावें व त्यांत बाजूला ठेवलेली साय व दुसऱ्या भांड्यांत ठेवलेलें दूध मिसळावें. ह्या मिश्रणांत १७५ ग्रेन लॅक्टोज् दुग्ध-शर्करा घालावी व हें सर्व थोडें आल्कलैन होईपर्यंत त्यांत चुन्याची निवळी घालावी. नंतर हे सर्व १५८° सेंटिग्रेड उष्णतेवर वीस मिनिटें शिजवावें म्हणजे सुपचनीय. दुग्ध तयार होतें. ह्या कृतीनें केसीनचा फाजील अंश निघून जातो व द्रव्य व सुपचनीय लॅक्ट आल्ब्युमिन शिल्लक राहातें. पाण्यापेक्षां ताकति साईचें मिश्रण अधिक चांगलें होतें. व पोटांत ह्याच्या गांठी मानवी दुधाप्रमाणे होतात. कूमिस- हें फसफसणारें पेय घोडीचे दुधापासून करितात. अलीकडे दुधापासूनहि करण्यांत येतें. तें लवकर पचतें व शोषले जाते. दुखणा- इतांना हें चांगलें पौष्टिक पेय आहे. गाईचे दूध गाईच्या दुधाचे प्रमाण शीतोष्णादि कटिबंध देश, जनावरांचे वय, वासराचें वय, ऋतु ह्यांवर अवलंबून असतें. सातारा प्रांतांत गाय संबंध दिवसांत ३-४ शेर दूध देते. इंग्लंडांत १२-१५ शेर दूध देते. गाईच्या दुधाचे विशिष्ट गुरुत्व १०३२ असावें. कांहीं मूत्रपिंडांच्या विकारांत नुसत्या दुधावर राहिल्याने चांगला उपयोग होतो. परंतु, दुधावरील साय खाऊं नये व त्यांत अधिक अस