पान:आरोग्यशास्त्र.pdf/१२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० आरोग्यशास्त्र ह्या क्रियेपासून फायदे - ( १ ) कृत्रिम मध्यस्थ पदार्थावर प्रवेश झाल्यानंतर वाढणाऱ्या जंतूंचे प्रमाण शेंकडा पांचपेक्षां कमी होतें; वह्या- मुळे दुधांत आम्लता उत्पन्न करणाऱ्या जंतूंचा प्रभाव १२ ते १४ तास चालत नाहीं. (२) ट्युबर्क्युलोसिस् ( क्षयग्रंथी), घटसर्प, टायफॉईड ज्वर, त्रिषूचिका, आंव व अतिसार उत्पन्न करणाऱ्या जंतूंचा नाश होतो. म्हणून ह्यानें दुधाचे द्वारां पसरणाऱ्या सांथी फार कमी होतील. दुधाचे द्वारां क्षयाचा (ट्युबर्क्युलोसिसचा ) प्रसार होण्याची मोठी भीति नष्ट होईल. वरले दूध पिणाऱ्या अर्भकांच्या रोगांचें व मृत्युसंख्येचें प्रमाण कमी होईल. म्हणून दुधाला उकळी फुटेपर्यंत तापविल्यानें तत्त्वांशाची हानि होते असें समजूं नये. स्टरिलाइज केलेल्या दुधापासून अर्भकांना स्कर्वी होते असा गैरसमज आहे. दुधांत पेजविशिष्ट ( स्टार्ची ) पदार्थ घातल्यानें किंवा शिळें दूध वापरल्यानें स्कर्वी होण्याचा संभव आहे. म्हणून कच्च्या दुधांत असलेला स्कर्वी-प्रतिबंधक धर्म नष्ट होण्याचा संभव आहे. एतदर्थ जीं अर्भकेँ फक्त वरच्या दुधावर असतात त्यांच्या दुधांत लिंबू, नारिंग किंवा द्राक्ष यांचा थोडासा रस घालावा. विकण्यासाठी ठेविलेलें दूध अधिक टिकावें म्हणून ७०° सेंटिग्रेड उष्णतेवर तें एक मिनिट किंवा कमी काल ठेवितात. दुधांतील द्रवांश आटवून त्याची पूड करून ठेवल्यानेंहि तें टिकतें. अथवा दूध बरेंच आटवितात. त्यांत शर्करा घालतात व कंडेन्स्ड मिल्क' हें नांव देऊन तें विकतात. 6 कंडेन्स्ड मिल्क घट्ट आटीव दूध-हें दोन प्रकारचें असतें - ( अ ) साखर घातलेलें, ( आ ) साखर न घातलेलें. शर्करेमुळे दुधांत बॅक्टेरि- आची वाढ होत नाहीं. दुसऱ्या प्रकारचें दूध १००° सेंटिग्रेड उष्णते-