पान:आरोग्यशास्त्र.pdf/१२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले १२१ घर तयार केलें असल्यामुळे त्यांतहि होत नाहीं. दूध घट्ट करण्याच्या कृतीनें क्षयग्रंथीच्या व अन्य रोगोत्पादक जंतूंचा नाश होतो. परंतु स्पोअर बोअरिंग बॅसिली, स्ट्रेटोकोकी, सार्सिनी, यीस्ट व अन्य सँप्रो- फाईट्स हे कधीं कधीं त्यांत सांपडतात. म्हणून गोठलेले दूध खात्रीनें जंतुविरहित असतें असें समजूं नये. साखर न घालतां घट्ट केलेलें दूध बालकांना द्यावें. गोड दुधांत शर्करा असते तसली मानवी दुधांत नसते. तिचें प्रमाण फार असल्या- मुळे पोटांत गुबारा, गुरगुर व अतिसार होतात. साखर नसलेल्या दुधा- पासून देखील एक तोटा आहे. ताज्या दुधांत असणारा स्कर्वी - नाशक धर्म असतो, तो ह्यांत नसतो. ह्या धर्मानें मुलांची वाढ चांगली होते. ( गोठलेल्या दुधांत साय नसल्यास त्यावर बालकास अयोग्य ' अशी चिठ्ठी लावण्याची सक्ती करावी. असल्या दुधानें अस्थिविकार, स्कर्वी हे रोग होतात. एक वर्ष पुरें होण्याच्या अति आचके, अतिसार, श्वासनलिकांचा दाह व गुजराथी हे रोग होऊन तीं मृत्युमुखी पडतात. एक वर्षाचे पुढे जगली तर त्यांची वाढ खुंटते. त्यांची मानसिक शक्ति कमी होते. ज्या मुलांना बाल्यावस्थेत ताजें दूध मिळत नाहीं, त्यांना मेंड- क्याचा दाह, अॅडेनॉइड्स, दाभाडांची अपुरी वाढ, अनियमित दंतोनम ह्या विकारांपासून होणारे दुष्परिणाम भोगावे लागतात. ताज्या दुधावर वाढलेल्या मुलांना हे विकार होण्याचा संभव कमी असतो. बिस्किटें व इतर खाद्य पदार्थ टिकावे म्हणून टाकणखार, बोरिक अॅसिड, सॅलिसिलेट्स, बेंझोएरन्स्, फार्मिक आल्डेहाईड, सॉल्टपीटर, आमोनिई कोरिम्, कॅल्शियम सल्फेट, तुरटी, स्पिरिट्स् आफ वाइन, सल्फ्यूरस अॅसिड्, बाय-सल्फैड ऑफ लैम, मोरचूद वगैरे पदार्थ घालतात. अन्नत कसलाही परकी पदार्थ घालणें आरोग्याच्या विरुद्ध आहे. बोरिक ॲसिडासारख्या सौम्य पदार्थानेंहि अग्निमांद्य, अपचन व अशक्तता