पान:आरोग्यशास्त्र.pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ आरोग्यशास्त्र होते. शिवाय अन्न शिळें आहे किंवा ताजें आहे हे खाणाराला समजत नाही; म्हणून हे पदार्थ घातल्यानें लबाड व्यापाऱ्यांना यांच्या सहाय्याने गि-हाइकांस फसवावयास सांपडतें. एक पौंड अन्नांत २० ग्रेन बोरिक अॅसिड घातलें तर दुर्गंध दडतो. पण जंतूंच्या वाढीला आळा बसत नाहीं. साईला पुष्कळ शीतता लावून गार ठेविल्यानें किंवा २१२° ते २२०° फॅ० उष्णतेवर ३ घंटा ठेविल्यानें ती टिकते. ह्याप्रमाणें स्टरि- लाईज केलेला साईचा द्रवांश व तुपट भाग भिन्न भिन्न होऊन पृथक् होतो. परंतु तापवावयाचे अगोदर होमोजिनायजर मधून काढली तर ती एकत्र एकजीव राहाते. अशा साईला उकळलेल्या दुधाचा वास येतो. दूध आठ दहा दिवस बिघडूं नये याबद्दलची कृति : - एक लिटर दुधांत हैड्रोजन पर - ऑक्सैडचें शेंकडा ३ प्रमाणाचें द्रावण १५ सी. सी. घालावे व हे मिश्रण ५२° सें. उष्णतेवर निदान तीन तास ठेवावें. दुधाचे उष्णतेनें हैड्रोजनवर ऑक्सैडचें पृथःकरण होतें. त्यांतील ऑक्सिजन बाहेर पडतो व नवोत्पन्न ऑक्सिजनच्या अंगी असणाऱ्या कृमिघ्न धर्मामुळे (सामान्य) नॉन-स्पोअरिंग जातीचे जंतु नष्ट होतात. हैं दूध उष्ण असतांनाच वाटलीत भरून बंद करून ठेवावें. दुधापासून होणारे विकार व अपाय दुधाच्या अंगीं प्राणिज, सेंद्रिय व खनिज जातीचे वायु व वाफा शोषण करण्याचा मोठा धर्म आहे. शिवाय शरीरास लागणारी अन्नां - तील सर्व द्रव्ये असल्यामुळे फंगॉइड बॅक्टेरिआ जातीच्या कृमींचा त्यांत प्रवेश झाल्यास तेथें त्यांची पुष्कळ वाढ होते; व त्यामुळे रोग - संचार व प्रसार होण्यास दूध हें एक मोठें कारण आहे. आईच्या अंगावर पितांना बालकांच्या पोटांत कृमींचा प्रवेश होत नाहीं. परंतु मुलांना गाईचें दूध पाजल्यास त्यांच्या पोटांत असंख्य कृमींचा प्रवेश होतो. कारण अस्वच्छतेमुळें त्यांत कृमी आलेले असतात. एक सी. सी. दुधांत