पान:आरोग्यशास्त्र.pdf/१३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले १२३ ५ लक्ष कृमींपर्यंत माफीची मर्यादा असते. पाश्चुराइज केलेल्या दुधांत ५० हजार, क्षयग्रंथीविरहित दाखला असलेल्या दुधांत १० हजार- पर्यंत कृमी माफ असतात; परंतु हें दूध गिन्हाइकाला १५° पेक्षां न्यून उष्णमानाचें असें पुरवावें. केर व पाणी यांच्या द्वारां दुधामध्यें कृमिसंचार होतो. धार काढतांना व पश्चात् केर जातो. व भांडी धुतांना किंवा लबाडीनें पाणी मिसळलें तर त्यांचा संपर्क होतो. दूध काढणें, जमविणें, धाडणें व सांठविणें ह्या - क्रियांत स्वच्छता ठेवावी तितकी थोडी. गोठे स्वच्छ असावे. जनावरांच्या . बसण्याच्या जागा निर्मळ असाव्यात. त्यांच्या आंगावरले केस कातरून त्यांना कृमिघ्न पाण्यानें धुऊन स्वच्छ ठेवावें. इरड करून देण्याची खोड फार घातुक आहे. निराणाच्या वरचे व आजूबाजूचे केस काढा - वेत. तेथें त्वग्रोग किंवा चिरम्या असल्यास त्यांवर तत्काळ उपाय करावा. दुधांत तेथील लस वगैरे जाऊं देऊं नये. धार काढणाराचे हात स्वच्छ असावेत. भांडी स्वच्छ व अधणाच्या पाण्याने धुतलेलीं असावीत. भांडया- च्या तोंडाचा व्यास आठ इंचांपेक्षां ज्यास्त नसावा. दूध काढल्याबरोबर तारेच्या बारीक चाळणीनें तें गाळावें व १५ सें. किंवा कमी उष्ण- मानावर तें ठेवावें. आगगाडीनें धाडतांना तें मोहरबंद करून धाडावें. विकत घेणारानें तें स्वच्छ भांड्यांत घ्यावें, व थंड जागेत झांकून ठेवा.. त्यांत केर, माशा, मुंग्या वगैरे पडूं देऊं नयेत. निरनिराळ्या ठिकाणचें दूध एकाच ठिकाणी सांठविणें समंजस - पणाचें नाहीं कारण स्वच्छता राखतात त्याचें, व स्वच्छ नसलेलें दूध एकत्र करण्याने सर्वच दूध बिघडतें. म्युनिसिपलिटीनें कंत्राटदाराकडून दुधाचे नमुनेदार दुकान ठेववायें व स्वच्छतेबद्दल त्यास सर्व शतीं पाळा- वयास लावाव्या. असल्या दुकानापासून गवळ्यांना व लोकांना चांगलें शिक्षण मिळेल.