पान:आरोग्यशास्त्र.pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही



अन्न, पेयें व मसाले १२७ (४) साखरेची भेसळ: - दुधांत समभाग मंद केलेलें हैड्रोक्लोरिक अॅसिड घालावें, मग पांच ग्रेन रिजार्सिनची पूड घालून दूध तापवावें. दुधांत साखर असल्यास रक्तासारखा तांबडा रंग येईल. (५) स्टार्च: - दुधांत आयोडिनचें द्रावण घालावें. स्टार्च असल्यास निळा रंग येईल. (६) दुग्धदर्शक लॅक्टोस्कोपनें चरबी असल्यास दुग्ध-दर्शकानें समजते. इंग्लंड व यूरोपच्या इतर देशांतील कांहीं शहरांत जंतुविरहित दुधाचे डेपो म्युनिसिपलिटयांनी स्थापन केले आहेत. गाईच्या चांगल्या दुधांत थोडें पाणी, साखर व साय घालतात, नंतर हे सुमारें पांच औंसांच्या अंगच्या बुचाच्या कुप्यांत घालतात. ह्या कुप्यांना जंतुनाशकांमध्यें (स्टरिलैजर मध्ये) १०२° सें. उष्णता सुमारें ५ मिनिटेंपर्यंत लावितात. पुढें टोपल्यांत ठेवितात. वापरण्यापूर्वी ह्या कुप्या थोड्याशा गरम पाण्यांत ठेऊन नंतर बूच काढून कुपीलाच बोंडशीं लावून पाजतात. सुकें दूध: - पोकळ फिरते रूळ २५०° फॅ. उष्णतेचे ४० पौंड दाबाचे वाफेनें तापविले जातात. त्यावर दुधाची सारखी धार पडते; त्यामुळे वाळ- लेल्या दुधाचे पापुद्रे जमतात. ते पापुद्रे चाकूच्या पात्यांनी आपोआप सोडविण्याची व्यवस्था त्या यंत्रांत असते. हे कुटून चाळण्यांत येतात. ही पूड जंतुविरहित असते. हिचे निर्वात पुढे पुष्कळ काळ टिकतात. वापरतांना ह्या पुडींत बरोबरीनें पाणी घालतात. हें द्रव अर्भकांना चांगलें पचतें. स्कर्त्री होऊं नये म्हणून नित्याप्रमाणें फलांचा ताजा रस द्यावा. ही पूड स्टरिलाइज दुधाइतकी गुणांनीं असून स्वस्त पडते. लोणी (बटर) दुधाची साय योग्य अशा मध्यस्थ पदार्थात घुसळल्याने किंवा दह्यांत पाणी घालून तें घुसळल्यानें स्नेही पदार्थांचे कण एकत्र जमतात, त्यांच्या पोटांत केसीन व सिरमचा भाग अडकून राहतो. लोण्यांत असणारा