पान:आरोग्यशास्त्र.pdf/१३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही



अन्न, पेयें व मसाले १२९ वाढत जातो व आल्कलाइड जातीचे पदार्थ, एक्स्ट्रॅक्टिव्हज् व सुवासिक ऑसिडें उत्पन्न होतात. हे पदार्थ निरुपद्रवी असतात. परंतु कचित् वेळी टायरो कॉक्सिकॉन नांवाचा पदार्थ झाल्यास तसल्या आटीव दह्यापासून एट्रोपीन विषाप्रमाणें भावना होतात. त्या अशा:—-- चक्कर, उम्हासे, वांत्या, अतिसार, शक्तिपात, स्नायूंमध्यें पेटके, हुडहुडी भरणें इत्यादि भावना मुख्यतः अमेरिकेंत नजरेस पडतात. साय, लोणी, स्वस्त आइसक्रीम व उष्ण हवा असतांना सांठवून ठेवलेल्या दुधांत हा पदार्थ सांपडतो. दही दुधांत फेसळण्याची क्रिया (फर्मेंटेशन्) घडून दही बनतें. हिंदु- स्थानांत दही खाण्याची फार वहिवाट आहे. विरजण लाविल्यापासून दही छत्तीस तासांच्या आंत खातात. स्ट्रॅटोथ्रिक्स नामक जंतूंमुळे दह्यांत लॅक्टिक अॅसिड उत्पन्न होतें. हे जंतु सर्व रोगजनक जंतूंचा नाश करितात. शेंकडा भागाच्या लॅक्टिक अॅसिडाचे द्रावणानें पांच मिनिटांत कॉमा बॅसिलस मरतात असें प्रो. किटस्टो ह्यांनी सिद्ध केलें आहे. ताक ताकांत केसीन एकजीव मिसळले जात असल्यामुळे तें पचण्यास हलकें असतें. व्हे: - दुधांतून केसीन काढून घेतल्यावर जो भाग उरतो त्यास व्हे म्हणतात. तूप म्हशीच्या व गाईच्या तुपाचें विशिष्टगुरुत्व '९११ ते ९१३ आहे. तुपाच्या विरघळण्याचें उष्णतामान ३४ ते ३५ अंश सेंटिग्रेड ९