पान:आरोग्यशास्त्र.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आरोग्यशास्त्र . निरुपयोगी असल्यामुळे साबण वाया जातो. वापरलेल्या पाण्यांतील क्षार संपल्याशिवाय फेस येत नाही, व धुण्याची क्रिया चालू होत नाही. एक गुंज खडूमुळे ८ गुंजा साबू नासतो. वृष्टिजलाचे काठिण्य बहुशा ३ अंशापेक्षा कमी असते, म्हणजे एक शेर पाण्यांत खडू अथवा इतर खनिज क्षार गुंजेपेक्षा कमी असतात. गांवांतील पाणी कठिण असल्यास पावसाचे पाणी कधीहि वाया घालवू नये. शिसे, लोह व जस्त या धातूंचे भांड्यांत वृष्टिजल ठेवल्यास त्या धातु वृष्टिजलांत विरण्याचा संभव असतो हे मोठे वैगुण्य आहे. म्हणून वरील धातूंचे पात्रांत अगर हौदांत तें सांठवू नये व शिशाचे पत्रे घात- लेल्या छावणीवर पडलेले पाणी पिण्यास घेऊ नये. भूपृष्ठावरील उदक पर्वत असलेल्या प्रदेशांत डोंगराचे बाजूवरून उतरणारे ओढे, नाले, एका ठिकाणी जमून ज्या फटींतून ते बाहेर पडतात, तेथे मोठा भक्कम बांध घालून सर्व जल अडवितात. त्यामुळे उंच भागी मोठे कृत्रिम सरो- वर निर्माण होते. हे पाणी जवळच्या गांवांना उपयोगी पडते. या सरो- वरांतील पाणी अन्य जागी सांठविण्यास मोठे जलाशय करितात. नुसत्या गुरुत्वाकर्षणशक्तीने गांवांतील अत्युच्च घराचे आढ्यापेक्षां नळीची धार तेरा हात उंच उडावी इतक्या उंचीवर असले जलाशय करावेत. पूर आल्यामुळे झालेले कर्दमजल असल्या जलाशयांत जाऊ नये म्हणून अन्य मार्गाने त्याचा निकाल करण्याची व्यवस्था केलेली असते. स्वाभाविक सरोवराचे उदक वृष्टिजलाइतकें मृदु असते. कधी कधी सरोवरांचे अथवा जलाशयांचे उदकांत आल्जी नामक सूक्ष्म जंतूंचा प्रसार होतो. पुढे ते जंतु सडतात, त्यामुळे पाण्याला तांबूस रंग येतो, व एक प्रकारचा दुगंध येतो. जलाशयावर झांकण असल्यास आल्जीपासून सहसा उपसर्ग होत नाही. >