पान:आरोग्यशास्त्र.pdf/१४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन, पेये व मसाले १३३ त्याची घटना — नैट्रोजनयुक्त पदार्थ १५ स्नेही पदार्थ क्षार ३.५ ५.७ न चाळलेल्या कणकेची पोळी जड असते, व आंतड्यांना क्षोभ उप्तन्न करते. परंतु पचली तर फार पौष्टिक असते. सशक्त किंवा राकट मनुष्यांनी खाऊन पहावी. गव्हाचा बाहेरील भाग कठीण कवचासारखा असतो. त्यास पेरिकार्प ह्यणतात. हा गव्हांत शेकडा १५ भाग असतो. ह्या कवचाच्या आंतील भागास एंडोस्पर्म म्हणतात. विशाल व पातळ पेशी (सेल्स) व स्टार्च- चे (पिष्ट पदार्थ) कण यांनी हा गर्भातील भाग घटित आहे. हा कडा ८० भाग असतो. गव्हाच्या रुंद अणीकडे शेंकडा १३ ते २ भाग बीज अथवा अंकुराचा भाग म्हणजे एंत्रिओ ऊर्फ जर्म हा भाग असतो. अलीकडे पिठाच्या गिरणीत कुरुंदी जात्याप्रमाणें चक्कीची ठेवण व व्यवस्था असते. खालीं दगड स्थिर असतो व वरील फिरता असतो. कणकीतील कोंड्याचा सर्व भाग निघाला म्हणजे पीठ पांढरें राहतें. परंतु ह्यांत बहुतेक स्टार्च असल्यामुळे सत्त्व कमी असतें. कणीक सफेद दिसते. गिरणींतील निघणाऱ्या स्वच्छ पिठी जिनसांतून व्हिटॅमिन्स कमी होतात व हा अवगुण आहे. करितां स्वच्छ पिठाचा गिरणींतील मादा तितका चांगला नव्हे. गव्हांत सकस व निकस असे प्रकार असतात. म्हणून निव्वळ गहूं या शब्दावर जाऊं नये. सकस असेल तोच वापरावा. विजेच्या सहाय्यानें ओझेनू व नायट्रस ऑक्सैड वायू उत्पन्न करून कणीक रंगहीन व सफेद करण्याची चाल पडली आहे.