पान:आरोग्यशास्त्र.pdf/१४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ आरोग्यशास्त्र नाचणी:- नाचणी पचण्यास जड असते. तांदळापेक्षां ही अधिक शक्तिप्रद आहे. बाजरी ः— गव्हाशीं तुलना करितां बाजरीमध्ये नैट्रोजनयुक्त पदार्थ व शर्करा कमी आहे. परंतु सेल्युलोज व खनिज पदार्थ ज्यास्त आहेत. बाजरीच्या व गव्हाच्या स्टार्चचे कण बहुतेक सारखे दिसतात. बाजरी पौष्टिक आहे. तिच्या राखेंत लोह व फॉस्फेट्स सांपडतात. ग्रीक व रोमन लोक पैलवानांना बाजरी देत असत. मकाः- - कांहींसा पौष्टिक आहे. ह्यांत तेलाचा भाग ज्यास्त असतो. ह्यांत पेलीग्रा नामक कीड असल्यास चर्मावर अनिष्ट परिणाम होतो. सातूः - फार पौष्टिक व कांहींसें मृदु रेचक आहे. ह्यांच्या पिठांत कोंडा व तूस राहिली तर आंतड्यांत त्यांच्या गांठी होण्याचा संभव असतो. - डाळी उडीद, घेवडा, चवळई, तूर, पावटा, मटकी, मसूर, मूग, वाटाणा, हरभरा वगैरे डाळींत नैट्रोजनविशिष्ट भाग पुष्कळ असतो. डाळींतील ह्या घटकाला लेग्युमिन् म्हणतात. भातासारख्या स्टार्चमय पदार्थाबरोबर डाळीचे पदार्थ अधिक खाण्यांत येतात व हे योग्य आहे. डाळींपैकीं तुरीची व हरभऱ्याची डाळ विशेषेकरून खाण्यांत येते. डाळींत पोटॅश, चुना व गंधक हे पदार्थ असतात. तांदूळ व जोंधळे इत्यादींपेक्षां डाळी पचण्यास अधिक जड असतात. -- उडीद :- ह्यांत नैट्रोजनचा भाग पुष्कळ असतो. हा पौष्टिक आहे पण जड आहे. हा बेतानें खावा. घेवडाः — हा पचण्यास जड आहे. ह्यानें पोटांत वायु सांठतो. चवळाई:- ही पचण्यास कमी जड आहे.