पान:आरोग्यशास्त्र.pdf/१४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले १३७ तूर : - ही पचण्यास फार हलकी असते. ही फार पौष्टिक आहे. ही पुष्कळ वापरतात. पावटा :- हा पौष्टिक असला तरी फार वातूळ आहे. ह्यानें पोटांत वायु सांठतो. मसूरः - ही अवरोध होऊ देत नाहीं. ही पचण्यास हलकी असते. कांहीं प्रांतांतही वापरतात. मूग : - मुगाची डाळ पौष्टिक व हलकी आहे. ही किंचित् वातूळ आहे. वाटाणा ः— वाटाण्यांत नैट्रोजनयुक्त पदार्थ पुष्कळ असतात. पण हा पचावयास जड व वातूळ आहे. हरभराः - पौष्टिक व धातुपौष्टिक आहे. ह्यानें पोटांत मध्यम वायु धरतो. हा चवदार आहे, रोज वापरण्यांत येतो. कंद व मुळे आरारोटः- कोकणांत व महाबळेश्वरावर ह्याचे कंद आपोआप रानो- माळ उगवतात. ह्या कंदांपासून काढलेल्या सत्त्वास आरारोट म्हणतात. ह्या सत्त्वांत फक्त स्टार्च असतो. तान्ह्या मुलांना ह्याची लापशी देतात. आरारोट हलका असल्यामुळे रोगोत्तर क्षीणतेंत वापरतात. साबुदाणाः -- ताडाच्या जातीच्या वृक्षांच्या गाभ्यापासून साबुदाणा तयार करितात. ह्याचे गुणधर्म आरारोटाप्रमाणेच आहेत. आजारपणांत व रोगोत्तर क्षीणतेंत हा वापरतात. बटाटे :- ह्यांमध्यें नैट्रोजनयुक्त व स्नेहयुक्त पदार्थ फार कमी असतात. परंतु चांगले शिजविले तर ह्यांतील स्टार्च पचण्यास सुलभ जाते. बटाटा सालींसकट शिजवावा व खावा; कारण सालींत नमकें (साल्ट्स) पुष्कळ असतात. बटाट्यांत मॅलेटस्, टार्ट्रेट्स व सैट्रेट्स नामक उद्भिज आम्ल (अॅसिड्स् ) पुष्कळ असल्यामुळे स्कर्वी नामक मुखाचे व रक्ताचे रोगांत बटाटे फार उपयोगी आहेत.