पान:आरोग्यशास्त्र.pdf/१४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ आरोग्यशास्त्र भुईमूग :-- ह्यामध्यें नैट्रोजनयुक्त पदार्थ पुष्कळ असतात. स्नेहयुक्त पदार्थ फार आहेत व स्टार्च कमी आहे. पौष्टिकपणांत भुईमूग मांसाहून चढ आहे. निदान शाकाहारी लोकांनीं भुईमूग रोज खात जावा. हा प्रमाणाबाहेर खाल्ला तरच बाधतो. रताळें :-- हें पचण्यास थोडें जड आहे. फलाहार करण्याच्या दिवशीं रताळें वापरतात. हा आरोग्यकारक जिन्नस नसल्यामुळे रोज वापर- ण्याच्या उपयोगी नाहीं. शिंगाडा :-- हा थंड, हलका व पित्तनाशक आहे. भाजीपाला काकडी : – थंड व मूत्रल असते. काकडी अनशीपोटीं खाऊं नये. खाल्ल्यास आंव होते. कांदा:--भाजी व मसाला म्हणून कांदा फार वापरतात. हा थंड आहे. हा खाल्ल्यानें स्कर्वी नामक मुखाचा व रक्ताचा रोग होत नाहीं. गाजरः - गाजरांत नमकें अधिक असतात व नैट्रोजनयुक्त भाग थोडा असतो. घोसाळें:- पौष्टिक, मूत्रल व अन्नमार्गास मोवारी आणणारें आहे. ह्याची भाजी अतिसार व आंवेंत पथ्यकर आहे. दोडका :-- ह्याची भाजी आवेंत देऊं नये. भेंडी :-- हिची भाजी कोणत्याहि विकारांत व ए-हवीं खावी. ही फार पथ्यकर आहे. आंतड्यास मोवारी आणण्याचा व मूत्रलधर्म भेंडींत असल्यामुळें ही अतिसारांत, धातुविकारांत व आवेंत उपयोगी आहे. भोकरः - - ह्याची भाजी कमी वापरतात. क्वचित् कच्च्या भोंकरांचें लोणचे घालतात. अन्नमार्गाच्या व सर्व ठिकाणच्या श्लेष्मल त्वचेला ह्यानें मोवारी येते. भोंकर फार वापरण्यांत येत नाहीं.