पान:आरोग्यशास्त्र.pdf/१४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले १३९ भोपळा (दुधीया) : - - ह्याची भाजी आरोग्यकारक आहे. एइवीं किंवा दुखण्यांत वापरण्यास योग्य आहे. भोपळा (लाल ): - - हा उष्ण आहे व आरोग्यकारक नाहीं असें मानतात. मुळा व त्याच्या शेंगा :- मुळा थंड, पाचक व चवदार आहे. मेथी :- हिची भाजी फार वापरतात. ही वायुहारक व किंचित् सारक आहे. शेवगाः - - ह्याच्या शेंगा कढी, आमटी वगैरेमध्यें आवडीनें घालतात. ह्याचें सेवन केल्यास गोल जंत होण्यास प्रतिबंध होतो. सर्दी, उसण व संधिविकार ह्यांत शेंगा खाव्या. फळें फळांतील व्हिटॅमिन्स हे पाचक व पौष्टिक आहेत. मुख्य मुख्य फळांची त्रोटक माहिती पुढें दिली आहे. आंबाः -- कच्चा आंबा स्कर्त्रीनाशक आहे. त्याचें लोणचें व पन्हें करितात. पक आंबा मधुर, पौष्टिक व किंचित् सारक आहे. आंबरस फार खाल्लयाने होणाऱ्या ढाळावर आंब्याची भाजलेली आंठळी १॥ ते २ मासे प्रमाणांत दिवसांतून ३-४ वेळां द्यावी. अंजीर : -- पक्क अंजीर मधुर, रुचकर व पौष्टिक आहे. काजू:--काजू पौष्टिक आहेत. केळे : -- कच्च्या केळाची साल काढून त्याच्या कचऱ्या करून वाळ- वाव्या. मग त्यांचें पीठ करून ठेवावें. ह्या पिठांत नैट्रोजनचा थोडा भाग असतो, व स्टार्च पुष्कळ असतो. ह्याची लापशी किंवा थालिपीठ उपवा- साला किंवा एन्हीं खाण्यास योग्य आहे. पक्क केळें फार गोड व पौष्टिक आणि किंचित् सारक असतें. त्यांत शेंकडा २० भाग शर्करा असते.