पान:आरोग्यशास्त्र.pdf/१४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० आरोग्यशास्त्र खजूर व खारीकः — पौष्टिक व किंचित् सारक आहेत. खजूर तुपाबरोबर खावा. खारकेची लापशी करून खातात. तालीम करणारे लोक खारीक व नारळीचें खोबरें खातात. गोडंबी : - बिब्याच्या आंतील मगजास गोडंबी म्हणतात. गोडंबी पौष्टिक, अग्निदीपन, उत्तेजक व वर्णसुधारक आहे. डाळिंब : - पक्क डाळिंब गोड व किंचित् तुरट असतें. हें तृषानाशक, रुचकर व आल्हादकारक असतें. ज्वरांत व कासविकारांत डाळिंब खावयास देतात. द्राक्षैः -- पक्क द्राक्षं मधुर, रुचिप्रद, तृषानाशक, पौष्टिक व आल्हाद- कारक असतात. ज्वर, खोकला व रोगोत्तर क्षीणता ह्यांत द्राक्षे देतात. नारळ:- - पौष्टिक आहे. ह्याच्या ताज्या तेलाचा उपयोग कॉडलिव्हर तेलासारखा होतो. मुडदुसांत देतात. नारिंग:--पक्क फळ आंबटगोड, रुचिप्रद, शीतकर, तृषानाशक, आल्हादकारक व अग्निदीपक आहे. ज्वरांत देतात. पोपयाः -- कच्या पोपयाची भाजी करितात. तो यकृत्, पांथरी ह्यांच्या वृद्धींत उपयोगी आहे. ह्याच्यापासून पपेइन नामक अल्कलाइड काढतात. त्याचे गुणधर्म पेप्सिन्सारखे आहेत. पक्क पोपया मधुर असतो. तो रोज असल्यास जुनाट मलावष्टंभ दूर होतो. फणसः - पक्व फळांतले गरे फार पौष्टिक, मधुर व स्वादिष्ट असतात. बदामः–बदाम फार पौष्टिक व धातुवर्धक असतो. बदामांत स्टार्च नसतो, म्हणून मधुमेहाच्या रोग्यांना ते उपयोगी आहेत. पेयें पेयांच्यामुळे अन्न सुखानें व रुचीनें जातें. म्हणून त्यांना अन्नाचा सहाय्यक भाग म्हणतात. पेयांचें कार्य पचनेंद्रियांवर प्रत्यक्षपणें किंवा मेंदूच्या द्वारा होऊन पचन सुधारतें. जल हें मुख्य पेय आहे व सर्व पेयांमध्ये जलाचा थोडाफार भाग असतो.