पान:आरोग्यशास्त्र.pdf/१४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेये व मसाले वायु असलेले व खनिज जल १४१ मुख्यतः कॅर्बानिक अॅसिड व इतर वायु असलेलें, खनिज नमकांनी ( जसें पोटॅशिअम, सोडिअम, मॅग्नेशिअम व लिथिअम ह्यांचीं नमकेँ ) युक्त अशा नैसर्गिक झऱ्यांच्या पाण्याला खनिज जल असें म्हणतात. नद्या, विहिरी व झरे ह्यांच्या साध्या पाण्यांत कॅर्बानिक अॅसिड वायु व खनिज नमकांचें द्रावण घालून तयार करून बंद कुप्यांत ठेविलेल्या कृत्रिम जलाला देखील खनिज जल असें म्हणतात. नैसर्गिक अथवा कृत्रिम खनिज जलाला रुचि बरी असते व त्यानें तोंडाला अल्प चटका बसतो. त्यानें पचनाला मदत होते. कॅर्बानिक वायु- मुळे जठराच्या गतीला उत्तेजन मिळतें व जठराच्या मज्जातंतूंची ज्ञेयशक्ति कमी होत असल्यानें पोट दुखणें कमी होतें. खनिज जल घातलेलें दूध पोटांत गेल्यावर दुधाच्या कवड्या मृदु व लहान आकाराच्या होतात, म्हणून दूध लवकर पचतें. ह्या जलाच्या आंगीं मृदु रेचक धर्म असतो. ज्या स्थळीं शुद्ध जल नसेल त्या ठिकाणीं हें जल वापरणें हिताचें असतें. म्हणून प्रवाशांना व विषारी पाण्याच्या मुलुखांत राहणारांना ह्याचा चांगला उपयोग होतो. परंतु ज्या जलांत क्षारांचीं नमकें ( अल्कलैन सॉल्ट्स ) फार असतात, तें वापरल्यास मज्जातंतूंच्या संजाला क्षीणता येते म्हणून ते वापरू नये. परंतु सोडावॉटर करण्यांत जें पाणी वापरतात तें शुद्ध पाहिजे. खनिज जल नेहमीं जंतुविरहित असतें असें नाहीं. कोमा बॅसिलसखेरीज करून दुसरे पुष्कळ प्रकारचे जंतू कॅर्बानिक वायु असलेल्या जलांत जगतात. वर लिहिलेल्या पेयांशिवाय बाकीच्यांचे दोन वर्ग करितां येतील. ( अ ) फेसाळण्याची क्रिया न घडतां केलेली पेयें, ( आ ) फेसाळण्याच्या क्रियेनें केलेलीं मद्ये वगैरे पेयें.