पान:आरोग्यशास्त्र.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणी ओढे व नद्या उगमस्थानी व निर्जन अशा पर्वतांतून व पडजागेतून वाहणाऱ्या ओढयांचे व नद्यांचे पाणी भूपृष्ठावरील उदकाइतकें शुद्ध असते. त्यांचे तीरावर शेतवाडी व मनुष्यवस्ती झालेल्या जागेच्या पुढील भागाचे पाणी पिण्यास योग्य नसते. नदीचा प्रवाह ज्या स्थानांतून जात असेल त्या त्या जमिनीच्या रच- नेच्या मानाने तिचे पाण्यात भिन्न भिन्न क्षारांचे न्यूनाधिक प्रमाण असते. नद्यांची उत्पत्ति झरे, सरोवरे, ओढे ह्यांपासून झाल्यामुळे सर्वच नद्यांचे पाणी सारखे नसते. तिच्या घटकांपैकी ज्याचा ज्याचा भाग ग्यास्त असेल त्या मानाने तिचे गुण भिन्न भिन्न असतात. वृष्टीमुळे भूपृष्ठावरील सर्व प्रकारचे उद्भिज व प्राणिज पदार्थ नदीचे पाण्यांत मिसळून ते अशुद्ध व कधी कधी रोगट होते. गांवांतील मैलापाणी व धुणी इत्यादिकांनी तें बिघडते. ज्या स्थळी एकाद्या शहराचा मैला नदीत सोडलेला असतो त्या स्थानाचे वरील भागापासून नर्दाचे पाणी त्या शहरांत नेतात. परंतु त्या शहराचे वरील म्हणजे उगमाकडल्या नदी- तीरावर त्या गांवचा मैला त्यांतच सोडलेला असतो. म्हणून असा प्रश्न उद्भवतो की, मैला पडलेल्या नदीचे पाणी पुन्हा पिण्यालायक होतें की काय? जेव्हां मैला अथवा दुसरी दोषक द्रव्ये नदीमध्ये मिसळतात तेव्हां त्यांचे विलयन होऊन ती मंद होतात. त्यांचे मंद होण्याचे मान मैला व नदीतील पाणी ह्यांचे प्रमाणावर अवलंबून असते. ज्या ठिकाणी असले घाण पदार्थ पडतात त्या जागी येणारे पाणी शुद्ध असल्यास त्यांत मिश्र असलेला प्राणवायु (Oxygen ) घाणीबरोबर संयोग पाबून काही अंशी तिची शुद्धि व रूपांतर करतो. मलाचा येणेप्रमाणे नाश 'अरोबिक' अथवा प्राणवायूवर जगणाऱ्या बॅक्टेरिआकडून होतो. जर पाण्याचे