पान:आरोग्यशास्त्र.pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४४ आरोग्यशास्त्र कॉफीनें मलावरोध होत नाहीं. कॉफी सतत फार प्याली तर हृदाची धडधड व मज्जातंतूंच्या व्यापारांत विकृति होते. अपस्मार, हिस्टेरिआ व मज्जातंतु-शूल इत्यादि रोग होतात. भेसळः — कॉफीमध्यें चिकोरीची भेसळ घालतात. बटाटे वगैरेंची स्टार्च, साखरेचा कोळसा ( कॅरेमेल ) इत्यादींची भेसळ कचित् त्यांत असते. कोको ( Cocoa ) कोको हा पदार्थ थिओब्रोमा कॅकॅओ नांवाच्या झाडाच्या बियांपासून करितात. बियांत नैट्रोजन पुष्कळ असतो व तेलाचा भाग बराच असून स्टार्च असते. पण कोकोपासून जें पेय तयार करितात, त्यांत कोकोची पूड फार थोडी असल्यामुळे पोटांत जाणाऱ्या पौष्टिक भागाचें प्रमाण फार थोडें असणार. परंतु चहा व कॉफीप्रमाणें ह्यापासून दुष्परिणाम घडत नाहींत. कोकोच्या बियांत शेंकडा १५ भाग नैट्रोजनविशिष्ट द्रव्यें ५० भाग तेल व ०५ ते ०७ भाग कॅफीन्सदृश थिओब्रोमिन् असतें. मंदाग्नि मनुष्यासाठीं बियांतील तेलांपैकीं कांहीं भाग दाबानें व उष्णतेनें 'काढून टाकावा. चॉकोलेट:- बियांतील तेल न काढतां चॉकोलेट तयार करितात. त्यांत साखर व सुवासिक सेंट घालतात. कोकोंतील भेसळ -- साखर व स्वस्त जातीची स्टार्च ह्यांची भेसळ कोकोच्या पुडीमध्ये करितात. चहा, कॉफी व कोको ह्रीं अन्नें नव्हत. ह्रीं क्षुधाशांतीचीं साधनें नाहींत. थकव्यावर हंगामी उपाय म्हणून हीं वापरावीत. फारतर अन्नास सहाय्यक म्हणून अल्प प्रमाणांत वापरावीत. 1