पान:आरोग्यशास्त्र.pdf/१५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेये व मसाले १४५ थंडाई उत्तर हिंदुस्थानांत उन्हाळ्याच्या ऋतूंत दुपारी रोज थंडाई पिण्याची फार चाल आहे. गुलाबकळी, काकडी व कलंगडें ह्यांच्या सोललेल्या बिया, मिरें, धने व बदाम इत्यादि पदार्थ भिजत घालून व चांगले वाटून पाण्यांत कोळून घेतात व त्यांत साखर घालून पितात. थंडाईमुळे शरिरास गारवा येतो, उन्हाळ्याचे दुष्परिणाम कमी होतात, मनास उल्हास वाटतो व तृषा कमी होते. सरबत साखरेच्या पाकांत गुलाबाचें पाणी, वाळ्याचें पाणी, किंवा गुलाब, नारिंग, वाळा, लिंबू इत्यादि पदार्थांच्या ओटोपासून तयार केलेला एसेन्स् घालून गुलाबी, नारिंगी, वाळ्याची, लिंबाचीं इत्यादि सरबतें तयार करितात. नारिंगी व लिंबाच्या सरबतांत अल्प प्रमाणांत सैट्रिक अॅसिड घालतात. सरबतें वापरण्याची चाल हिंदुस्थानांत आहे. सरबतानें मनास हुशारी येते. नारिंगी व लिंबाच्या सरबतानें हुशारी येऊन तृषा कमी होते, आंगाली शीतता येते व उन्हाळ्याचे दुष्परिणाम कमी होतात. फेसाळण्याच्या क्रियेनें केलेली पेयें फर्मेन्टेड लिकर्स- द्राक्षशर्करेच्या द्रावणावर २० ते ३० अंश सेंटिग्रेड उष्णमानावर यीस्ट नामक वनस्पतीची क्रिया झाल्याने तिचें पृथःकरण होऊन आल्कोहॉल व कॅर्बानिक अॅसिड असे मुख्यतः दोन पदार्थ उत्पन्न होतात. यीस्ट वनस्पति लंबगोल सूक्ष्म सेंद्रिय पेशींनी (सेल्सनी ) घटित असते. शर्करायुक्त द्रव्यांत ह्या पेशींची अत्यंत वाढ होते. ऑल्कोहॉल- संबंधी फेसाळण्याच्या क्रियेस ( फर्मेन्टेशन ) आरंभ होतो. ह्या द्रव्यांतून कॅनिक अॅसिड वायु उडून जातो, व ऑल्कोहॉल हें द्रव्य द्रव पदार्थांत १०