पान:आरोग्यशास्त्र.pdf/१५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४६ आरोग्यशास्त्र विद्रुत होऊन राहतें. फेसाळण्यानें तयार झालेल्या द्रवाचे स्पिरिट, वाइन व बीअर असे तीन प्रकार आहेत. ह्यांशिवाय कंट्री लिकर अथवा अरक व ताडी असे आणखी दोन मुख्य प्रकार आहेत. स्पिरिट्स स्पिरिट्सचे ब्रॅंडी, रम्, व्हिस्की, जिनू व अॅब्सिथ असे प्रकार आहेत. (१) ब्रँडी :- ब्रॅंडी हें स्पिरिट् द्राक्षांपासून तयार करतात. त्यांत शेकडा ५० भाग ऑल्कोहॉल असतो व बाकीच्या द्रवांत अॅसिड्स, आल्डे हैड्स्, ईथर्स व उच्च ऑल्कोहॉल असतात. ब्रँडीचें विशिष्टगुरुत्व ०.९३० ते ०.९४० असतें. (२) रम् : - ही फेसाळलेल्या मोलॅसिसपासून तयार करतात. (३) व्हिस्की :- माल्ट केलेल्या धान्यापासून व्हिस्की तयार करतात. नव्या व्हिस्कीमध्ये अॅमिलिक ऑल्कोहॉल असतो. ह्या पदार्थामुळे कैफ जलदी येतो. नंतर डोकें अतिशय दुखतें व फार थकवा येतो. व्हिस्की - मध्ये शेकडा ५० भाग ऑल्कोहॉल असतो. (४) जिन् : - ह्यामध्यें ऑल्कोहॉलचे प्रमाण कमी असतें. ह्यांत अनि- परचें तेल असतें व ह्यांत पुष्कळ सुगंधी पदार्थ घालून ही मधुर केलेली असते. (५) अॅव्सिथ : - ह्या स्पिरिटास पुष्कळ प्रकारच्या स्थिर तेलांचा सुगंध लावतात. ह्या तेलांचा मज्जातंतूंवर विषारी परिणाम होतो. बाजारांतल्या साध्या ब्रॅंडीमध्यें धान्याच्या दारूची मिसळ असते व निव्वळ शुद्ध ब्रँडी मागणारास अशी दारू विकल्यास गुन्हा होतो. वाइन बोडों, बर्गंडी, हैन वाइन, शँपेन, मोसेल्स इत्यादि मंद जातीच्या वाइनमध्ये आकारमानानें शेकडा १० ते १५ भागांपेक्षां कमी ऑल्को-