पान:आरोग्यशास्त्र.pdf/१५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेयें व मसाले १४७ हॉल असतो. पोर्ट, शेरी, मदीरा वगैरे तीव्र वाइनमध्ये शेकडा १५ ते २५ भाग ऑल्कोहॉल असतो. वाइनमध्यें ऑल्कोहॉलशिवाय रंजक द्रव्ये, शर्करा, सेंद्रिय ( ऑर्गेनिक) अॅसिडे व पोटॅशिअमसारखीं खनिज नमके असतात. द्राक्षांचा रस फेसाळून ( फर्मेन्टेशन् ) वाइन तयार करतात. स्वस्त जातीची वाइन दुसऱ्या फळांपासून तयार करतात. द्राक्षांपासून केलेल्या वाइनमध्ये भेसळ करून ठिककिाणच्या बाजारभावाप्रमाणे ती विकण्यांत येते. घरी केलेली वाइन व सिडर ही लिथार्ज नामक शिशाच्या पदार्थाची जिलई केलेल्या चिनई मातीच्या भांडयांत ठेवतात. त्यामुळे शिशाचा अंश वाइनमध्ये येतो. ह्या रीतीनें शिशाचें विष शरिरांत शिरतें. मातीची भांडी वापरावयाची झाल्यास त्यांना नमकाची कठीण जिलाई केलेली असावी. पिपांत किंवा बाटलीत त्यांतील रंजक द्रव्ये व टॅनिक अॅसिड वाइन फार काळ ठेवल्यास ह्यांचा साका बसतो व कांहीं साखर उडून जाते. भांड्यांत हवा शिरण्यास पूर्ण प्रतिबंध केला नसल्यास हेवेबरोबर मायकोडर्मा अॅसिटी नामक फर्मेन्ट आंत शिरतो व ऑल्को- हॉलच्या कांहीं भागाचें रूपांतर झाल्यामुळे अॅसेटिक अॅसिड उत्पन्न होऊन ती आंबट होते. साखर, भिन्न प्रकारचे ईथर व पतंगाचें लांकूड, तुरटी, कॅल्शिअम् सल्फेट इ० पदार्थ भेसळ करण्याच्या कामी अधिक वापरतात. कॅल्शिअम् सल्फेटमुळे वाइनचा रंग अधिक अधिक खुलतो. परंतु ह्या पदार्थामुळें त्यांत पोटॉशअम सल्फेट नांवाचा रेचक पदार्थ तयार होतो. बीअर बीअर जातीचीं पेयें पूर्वी फक्त माल्ट व हॉप ह्यांपासून तयार करीत असत. परंतु आतां तीं स्टार्च, शर्करा व अनेक प्रकारच्या