पान:आरोग्यशास्त्र.pdf/१५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ आरोग्यशास्त्र उद्भिज कडू पदार्थांपासून करण्यास कायद्यानें मोकळीक दिली आहे. मोडाच्या बालपासून फेसाळण्याच्या क्रियेनें तयार केलेल्या पेयाला बीअर म्हणतात. बार्ली प्रथम थोडी भिजवून नंतर उबाऱ्यांत ठेवतात. तिला थोडे मोड येऊं लागले म्हणजे डायास्टीज नांवाचा फर्मेन्ट उत्पन्न होतो. पुढे भट्टीत भाजतात, म्हणजे मोड वाढत नाहींत व माल्ट उत्पन्न होत नाहींत. नंतर १८०° फॅ० उष्णमानाच्या पाण्यांत घालून बाल ३ तास चांगली ठेचतात व ढवळीत बसतात. ह्या अवधीत डायास्टांजचें स्टार्चवर कार्य घडून त्यापासून माल्टोज नामक शर्करा होते. ह्या शर्करेंत फेसाळण्याची क्रिया सुलभतेनें होतें. हा द्रव गाळून घेऊन त्यांत हॉप्स घालून शिजवावा, थंड झाल्यावर हौदांत भरून ठेवावा व त्यांत ( यीस्ट) खीमा घालावा. फेसाळण्याची क्रिया योग्य कालपर्यंत घडल्यावर त्यांतील यीस्ट काढून घ्यावें व बीअर पिपांत ओतून ठेवावी. अलीकडे ग्ल्यूकोसिस व इन्वर्ट शर्करा माल्टच्या ऐवजी फार वापरू लागले आहेत. तांदूळ व अन्य प्रकारचे पिष्टमय ( स्टार्च) पदार्थांवर सल्फ्यूरिक अॅसिडाची क्रिया घडवून इन्वर्ट जातीच्या शर्करा तयार करतात. आतां व्यापारी ( कमर्शिअल ) सल्फ्यूरिक अॅसिडामध्यें सोमलाचा अंश असतो. कारण अशोधित लोहापासून तें तयार करतात. अशा लोहांत सोमलाचा अंश असतो. इंग्लंडांत १९०० व १९०१ सालांच्या हिंवाळ्यांत बीअर पिणाऱ्या शेंकडों लोकांत सोमलाच्या भावना नजरेस आल्या. ( ४ ) कंट्री स्पिरिट अथवा अरक :-तांदूळ, मोहाची फुलें, गूळ (४) इत्यादि पदार्थापासून फेसाळण्याच्या क्रियेनें ( फर्मेन्टेशन ) करतात. त्यांत शेकडा सुमारे ४० भाग ऑल्कोहॉल असतो. (३० अंश अंडरप्रूफ). ( ५ ) ताडी :- ताड, खजूर, माड ह्यांच्या रसापासून फेसाळण्याच्या क्रियेनें ताडी तयार होते.