पान:आरोग्यशास्त्र.pdf/१५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्न, पेये व मसाले १४९ ऑल्कोहॉलचे परिणाम:- जठरांत गेल्यावर ऑल्कोहॉल जशाचा तसाच रक्तांत शोषला जातो. त्याचें अतिसेवन केल्यास त्याचें रूपांतर न होतां तो शरिराच्या बाहेर जाऊं लागतो. त्याच्या सुमारें शेकडा अठ्या- ण्णव भागाचा शरिरांत नाश होतो. अल्प प्रमाणांत घेतल्यास स्नेही पदार्थ, शर्करा, व अन्न यांप्रमाणे त्याचा उपयोग होतो. कारण चर्बी व कार्बोहैड्रेट्प्रमाणें त्याचेहि ऑक्सिडेशन ( प्राणवायूशी संयोग होणें ) झाल्यानें उष्णता व शक्ति निर्माण होते. निरोगी मनुष्य अथवा जनावर ह्यास आल्कोहॉल पूर्ण प्रमाणांत दिल्यास खालील भावना होतात. ( १ ) जठराच्या रक्तवाहिन्या रुंद होतात, जाठररसाची वृद्धि होते. ( २ ) हृदाच्या क्रियेची गति व जोर वाढतो. ( ३ ) बाह्य भागांतील रक्तवाहिन्यांच्या व्हॅसोमोटर मज्जातंतूंचा कांहींसा शक्तिन्हास होतो व रक्तवाहिन्या विस्तृत होतात; त्यामुळे त्वचा व इतर भाग आरक्त होतात. ( ४ ) मेंदूला कांहींसा संधपणा येतो. बाह्य चेतनांची शीघ्रता, लक्षपूर्वक विचार करण्याची शक्ति, इंद्रियजन्य ज्ञान हीं सर्व कमी होतात. त्याचप्रमाणें ऐच्छिक स्नायूंची कार्यक्षमता कमी होते. ( ५ ) शरिराचें उष्णमान थोडें कमी होतें. फुप्फुसाच्या द्वारां कॅर्बानिक अॅसिड वायूचे उत्सर्जन कमी होतें. तरी पण शरिरांतील घडामोडी ( Metamorphosis ) मध्यें विलंब किंवा कमतरता येत नाहीं. मूत्रांतील यूरिआचें प्रमाण कमी होत नाहीं ह्यावरून हैं सिद्ध होतें. ( ६ ) मूत्रांतील द्रव भागाची आम्लता थोडी वाढते. ऑल्कोहॉलचे दीर्घकाल व अपरिमित सेवन केल्यानें शरिरांत निकृष्ट- भवन घडतें. प्रथम जठर व यकृत् व कांहीं कालानंतर मूत्रपिंड, फुप्फुस, मेंदू व रक्तवाहिन्या यांत फेरफार होतो. पेशींच्या (Cells) बाह्यभागी असणाऱ्या तंतुमय त्वचेची वृद्धि प्रथम होते. नंतर ती