पान:आरोग्यशास्त्र.pdf/१५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५० आरोग्यशास्त्र संकोचित होते व ह्या दाबामुळे पिंडांतील (Gland) पेशी आकुंचित होतात व त्यांच्या क्रियेचा -हास होतो. जठराचा विलंबी साव व संकोच, यकृताचा संकोच व पश्चात् उदर व रक्तस्राव हे ऑल्कोहॉलचे दुष्परिणाम प्रसिद्ध आहेत. पानासकतेपासून आयुष्याचा क्षय होतो हें आतां सर्वमान्य झालें आहे. दारूबाज लोकांत चौपट पांचपट मृत्युसंख्येचे प्रमाण असतें. ऑल्कोहॉलच्या मित सेवनाची गोष्ट निराळी. परंतु त्यापासूनहि अति गारठा किंवा ज्वर, उष्णमान, शारीरिक व मानसिक श्रम ह्यांचा शरिरा- वर दुष्परिणाम घडतो. शारीरिक कष्ट करणारांच्या रुधिराभिसरणावर त्याचा मोठा दुष्परिणाम होतो. कारण त्यामुळे हृदाला अधिक काम पडतें. परंतु त्याच्या बदला हृदाला फायदा होत नाहीं. ऑल्कोहॉलच्या सतत मितसेवनापासून अपाय झाल्याचे सिद्ध झालें नाहीं. बीअर व वाइनच्या स्वरूपांत घेतल्याने पचनास व पोषणास मदत होते. परंतु औषधी द्रव्याप्रमाणें प्रकृतिवैचित्र्यामुळे ऑल्कोहॉलच्या अल्प प्रमाणापासूनही कित्येकांना अपाय घडतो. एकाला जें प्रमाण मानवतें त्यानेंच दुसऱ्याला अपाय घडतो. पूर्ण निरोगी मनुष्यास ह्यापासून यत्किंचितही फायदा नसतो. बालकांना व तरुणांना तो निःसंशय नुकसानकारक आहे. ऑल्कोहॉलपासून रोगांस प्रतिबंध करण्याची शक्ति कमी होते. दाइयुक्तविकार जडण्यास अधिक पात्रता येते. मद्यपी लोकांना एकादा रोग झाल्यास त्याचें रूप तीव्र होतें व रोगमुक्ति उशिरां होतें. पाना- सक्तीमुळे क्षय होण्यास अनुकूल स्थिति उत्पन्न होते. त्यांच्या संतती - वर मोठा दुष्परिणाम होतो. पक्षघात, गतिहास, अपस्मार, खूळ ह्या रोगांमुळे मृत्यु आला नाहीं तरी कायमचे व्यंग राहतें. अशा संतती-